दादासाहेब गलांडे
पैठण येथील जायकवाडी धरणात ७७ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्यानंतर बुधवारी दोन्ही कालव्यांतून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आलं. जलसंपदा मंत्र्यांच्या आदेशानंतर ही पाणी पाळी सुरू करण्यात आली असून ती ९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. (Jayakwadi Dam Update)
यामुळे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील जवळपास २ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्राला खरीप हंगामासाठी पाणी मिळणार आहे. (Jayakwadi Dam Update)
पैठण येथील जायकवाडी धरणात ७७ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्यानंतर बुधवारी दोन्ही कालव्यांतून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आलं. (Jayakwadi Dam Update)
जलसंपदा मंत्र्यांच्या आदेशानंतर ही पाणी पाळी सुरू करण्यात आली असून ती ९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यामुळे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील जवळपास २ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्राला खरीप हंगामासाठी पाणी मिळणार आहे. (Jayakwadi Dam Update)
नाशिकच्या पावसाचा हा लाभ आता मराठवाड्याला दिलासा देणार आहे.
मराठवाड्याला खरीप हंगामात दिलासा देत जायकवाडी धरणातून बुधवारी (१६ जुलै) संध्याकाळपासून उजव्या व डाव्या कालव्यांतून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले.
धरणात ७७.१७ टक्के पाणीसाठा झाल्याने ही पाणी पाळी सुरू करण्यात आली असून, यामुळे पाच जिल्ह्यांतील जवळपास २ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्राला पिण्याचे व सिंचनाचे पाणी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी दिली.
नाशिकच्या पावसाचा फायदा
नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच जायकवाडी धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.
सध्या धरणात ७७.१७ टक्के पाणीसाठा आहे. दरम्यान, मराठवाड्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे पाण्याच्या तुटवड्याने खरीप हंगाम धोक्यात येऊ नये म्हणून लोकप्रतिनिधींकडून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी होत होती.
मुंबईत निर्णय; तत्काळ पाणी सोडण्याचे आदेश
या पार्श्वभूमीवर मुंबईत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी पाटबंधारे विभागाला तत्काळ पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार बुधवारी दुपारी ४ वाजता उजव्या कालव्यात २०० क्युसेकने तर सायंकाळी ५ वाजता डाव्या कालव्यात १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले.
कालव्यांचा लाभ
डावा कालवा : छत्रपती संभाजीनगर, जालना व परभणी जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्रास फायदा.
उजवा कालवा : १३२ किलोमीटर लांबीच्या या कालव्यातून छत्रपती संभाजीनगर, बीड व अहमदनगर जिल्ह्यातील ४४ हजार हेक्टर क्षेत्राला लाभ.
खरीपासाठी पाणी पाळी ९ ऑगस्टपर्यंत
खरीप हंगाम २०२५–२६ साठी पाणी पाळी बुधवारी सुरू झाली असून ती ९ ऑगस्टपर्यंत सुरू राहील. या कालावधीत दोन्ही कालव्यांतून पाणी देण्यात येणार आहे.
पाणी सोडताना कार्यकारी अभियंता प्रशांत संत, उपविभागीय अभियंते अशोक चव्हाण व श्रद्धा निंबाळकर, शाखा अभियंता मंगेश शेलार आदी उपस्थित होते.
पाच जिल्ह्यांना लाभ
खरीप हंगाम २०२५–२६ साठी उजवा व डावा कालव्याद्वारे पाणी पाळी बुधवारपासून सुरू करण्यात आली असून, जवळपास २ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार आहे. - प्रशांत संत, कार्यकारी अभियंता