Isapur Dam Water level : इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसामुळे वाढलेल्या पाण्याच्या आवकेमुळे धरणातीलपाणीपातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी ११ ऑगस्ट रोजी धरणाचे गेट उघडण्यात आले. (Isapur Dam Water level)
दुपारी १२ वाजल्यापासून पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून, नदीकाठच्या ३५ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.(Isapur Dam Water level)
धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेट क्रमांक २ व १४ हे २० सेंटिमीटरने उघडण्यात आले असून, सध्या १३३९ क्युसेक इतका पाणी विसर्ग सुरू आहे. पुढील दिवसांत पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्गात वाढ किंवा घट करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.(Isapur Dam Water level)
इसापूर धरणात सध्या ९३.९२ टक्के जलसाठा असून, पाणी पातळी ४४०.३५ मीटरवर पोहोचली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पेनटाकळी, साखरखेर्डा, मेहकर, डोणगाव, रिसोड, गोवर्धन, शिरपूर, गोरेगाव, कनेरगावनाका, अनसिंग, सिरसम, खंडाळा आणि इसापूर परिसरातून पाण्याची आवक वाढत आहे.(Isapur Dam Water level)
विदर्भ–मराठवाडा सीमेवरील आणि पुसद तालुक्यातील हे मोठ्या प्रकल्पांपैकी एकमेव मातीचे धरण असून, या वर्षी ९३.६२ टक्के भरले आहे. सोमवारी धरणाची तीन वक्रद्वारे २० सेंटिमीटरने उघडण्यात आली असून, त्यातून १९७५ क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.(Isapur Dam Water level)
धरणाचे एकूण १५ दरवाजे असून, २००६ साली सर्व दरवाजे उघडण्यात आले होते. २००२, २००६, २०१०, २०१३, २०२०, २०२१, २०२२ नंतर यंदा पुन्हा दरवाजे उघडण्याचा प्रसंग आला आहे.
धरणाची पातळी १५ ऑगस्टपर्यंत ४४०.३५ मीटर आर.ओ.एस. नुसार ठेवण्यासाठी अतिरिक्त पाणी सोडले जात असल्याची माहिती उपविभागीय अभियंता हनुमंत धुळगुंडे यांनी दिली.(Isapur Dam Water level)
दरम्यान, नदीकाठच्या बाधित होऊ शकणाऱ्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे, आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आणि नदीपात्रात जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(Isapur Dam Water level)