Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update: पावसाच्या तडाख्यात महाराष्ट्र! कुठे बरसणार जोरदार सरी? वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update: पावसाच्या तडाख्यात महाराष्ट्र! कुठे बरसणार जोरदार सरी? वाचा सविस्तर

latest news Heavy rains in Maharashtra : Maharashtra in the grip of rain! Where will it rain heavily? Read in detail | Maharashtra Weather Update: पावसाच्या तडाख्यात महाराष्ट्र! कुठे बरसणार जोरदार सरी? वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update: पावसाच्या तडाख्यात महाराष्ट्र! कुठे बरसणार जोरदार सरी? वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून, हवामान विभागाने (IMD) कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असून विजांचा कडकडाटही होत आहे. विशेषतः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह नागपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून, हवामान विभागाने (IMD) कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असून विजांचा कडकडाटही होत आहे. विशेषतः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह नागपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update)

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Weather Update:  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून, हवामान विभागाने (IMD) कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असून विजांचा कडकडाटही होत आहे. (Heavy rains in Maharashtra)

विशेषतः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह नागपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुढील काही दिवस वातावरण अस्थिर राहणार आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  (Maharashtra Weather Update)

राज्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी सुरू असून कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर इतर भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)

'या' भागांमध्ये पावसाचा जोर?

* हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, आज (२८ मे) रोजी कोकण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. याठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला  लागू करण्यात आहे.

* सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींचा इशारा आहे. दरम्यान, ठाणे, मुंबई, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांचा घाटमाथा आणि मराठवाड्यातील हिंगोली व नांदेड जिल्ह्यांमध्येही वादळी पावसाची व विजांच्या कडकडाट वर्तविण्यात आला आहे.

हवामानात का झाला बदल

बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याची तीव्रता उत्तरेकडे सरकताना वाढण्याची शक्यता आहे. छत्तीसगड व आग्नेय राजस्थानपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये चक्राकार वाऱ्यांसह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

पावसाचा परिणाम

* मंगळवारी (२७ मे) रोजी सकाळपर्यंत मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडला.

* रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे तब्बल २८० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावरही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

*  हवामान विभागाने नागरिकांनी उघड्यावर जाऊ नये, वीज चमकल्यास सुरक्षित स्थळी थांबावे, आणि नदीकाठच्या ठिकाण जाणे टाळावे अशी सूचना केली आहे.

* शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करावे आणि यंत्रसामुग्री व वीज उपकरणे सुरक्षित स्थळी हलवावीत.

* शेतमाल कोरड्या जागी साठवणूक करावी.

हवामान विभागाने जारी केला अलर्ट

अलर्ट रंगक्षेत्रसंभाव्य प्रभाव
🟧 ऑरेंजकोकण, पूर्व विदर्भमुसळधार पाऊस, विजांच्या गडगडाटासह
🟨 येलोघाटमाथा, मराठवाडा, उर्वरित विदर्भमध्यम ते जोरदार पाऊस, वादळी वारे
🔴 रेड (काही भागांत)रायगड, गडचिरोलीअतिवृष्टीची शक्यता, पुराचा धोका

हे ही वाचा सविस्तर :  Marathwada Weather Alert : मराठवाड्यात ३ दिवस वादळी पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का? वाचा सविस्तर

Web Title: latest news Heavy rains in Maharashtra : Maharashtra in the grip of rain! Where will it rain heavily? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.