Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > यंदा कसा राहणार उन्हाळा? राज्यात कोणत्या भागात उष्णतेची तीव्रता अधिक असणार?

यंदा कसा राहणार उन्हाळा? राज्यात कोणत्या भागात उष्णतेची तीव्रता अधिक असणार?

How will the summer be this year? In which parts of the state will the heat intensity be the highest? | यंदा कसा राहणार उन्हाळा? राज्यात कोणत्या भागात उष्णतेची तीव्रता अधिक असणार?

यंदा कसा राहणार उन्हाळा? राज्यात कोणत्या भागात उष्णतेची तीव्रता अधिक असणार?

summer temperature 2026 फेब्रुवारीपासूनच उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत. हवामान बदलांचा वेग व तापमानातील वाढ पाहता यंदाचा उन्हाळा परीक्षा पाहणारा ठरण्याची शक्यता आहे.

summer temperature 2026 फेब्रुवारीपासूनच उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत. हवामान बदलांचा वेग व तापमानातील वाढ पाहता यंदाचा उन्हाळा परीक्षा पाहणारा ठरण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारीपासूनच उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत. हवामान बदलांचा वेग व तापमानातील वाढ पाहता यंदाचा उन्हाळा परीक्षा पाहणारा ठरण्याची शक्यता आहे.

हवामान मॉडेल्स सूचित करताहेत की, राज्यासह मध्य भारतात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहू शकते. काही भागांत उष्णतेच्या लाटांचाही धोका संभवतो.

मार्चच्या बदलत्या स्वभावाकडे पाहिले असता असे लक्षात येते की, मार्च महिना हा संक्रमणाचा काळ आहे. हिवाळ्याची थंडी ओसरत असताना उन्हाळ्याची चाहूल लागते. मात्र, गेल्या काही वर्षांत मार्च अधिक तापदायक ठरला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार, मुंबईत तापमान ३९ ते ४० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचल्याची उदाहरणे ताजी आहेत. जरी हे उच्चांक काही दिवसांसाठी असले, तरी त्या काळातील उष्णतेचा ताण मोठा असतो.

कोकणात तुलनेने मध्यम ते उष्ण स्वरूपाचे तापमान अपेक्षित असले तरी मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवू शकते.

युरोपियन हवामान संस्था यांच्या अंदाजानुसार मध्य भारतात उष्णतेची शक्यता अधिक असून, त्याचा परिणाम किनारपट्टी भागावरही होऊ शकतो. भारतीय हवामान विभागाच्या २०२६ च्या उन्हाळ्यासंबंधित येणाऱ्या अंदाजाकडे बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे.

कोणते परिणाम?
◼️ उष्णतेच्या लाटा केवळ तापमान वाढवत नाहीत, तर जीवनशैलीवरही परिणाम करतात.
◼️ पाण्याची मागणी वाढते; जलसाठ्यांवर ताण येतो.
◼️ एसी, कूलरचा वापर वाढल्याने विजेची मागणी वाढते. परिणामी आऊटेज किंवा तुटवडा निर्माण होऊ शकतो.
◼️ शेती क्षेत्रात पिकांवर ताण वाढतो; अशावेळी सिंचनाची गरज अधिक भासते.
◼️ या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आपत्कालीन कक्ष सज्ज ठेवणे गरजेचे आहे.

एल निनोचे सावट आहे का?
◼️ वेगवेगळ्या जागतिक क्लायमेट पूर्वानुमानानुसार काही अंदाज समोर सध्या आले आहेत.
◼️ सध्या एल निनो किंवा ला नीना सक्रिय नसले तरी आगामी काही महिन्यांत एल निनो विकसित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
◼️ अधिकृत घोषणा नसली तरी हवामानातील घडामोडी लक्षात घेतल्या तर येणारा उन्हाळा अधिक तीव्र असण्याची चिन्हे आहेत.
◼️ पूर्वानुमानानुसार, २०२६ मध्ये भारतात एल निनोच्या परिणामाची शक्यता पाहता, त्यासंदर्भात अधिक विस्तृत माहिती मिळवण्यासाठी आपल्याला अजून काही दिवस वाट पाहावी लागेल.
◼️ आयएमडीचे २०२६ च्या उन्हाळा संबधित रिजनल पूर्वानुमान लवकरच येण्याची शक्यता आहे.
◼️ २०२६ वर्ष एल निनोचे वर्ष असण्याची शक्यता अनेक जागतिक हवामान गणिते दर्शवत असली तरी, त्याची प्रशांत महासागरातील व्युत्पत्ती व पुढील तीव्रतेच्या वेळा, कालावधी आदी घटकांवर त्याच्या प्रभाव कक्षा ठरू शकतील, पण यंदा उन्हाळ्यात चढीचे तापमान असू शकते.

- कृष्णानंद होसाळीकर
ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ

अधिक वाचा: आता कोणीही धान्यापासून वंचित राहणार नाही; १ एप्रिलनंतर रेशनमध्ये होणार 'हे' मोठे बदल?

Web Title : क्या इस बार भीषण गर्मी पड़ेगी? महाराष्ट्र में लू और एल नीनो की चिंता

Web Summary : विशेषज्ञों ने महाराष्ट्र में औसत से अधिक गर्मी की चेतावनी दी है। मराठवाड़ा, विदर्भ और मध्य महाराष्ट्र में लू चलने की संभावना है। एल नीनो का विकास अनिश्चित है, लेकिन उच्च तापमान की उम्मीद है। जल संकट और बिजली कटौती संभावित परिणाम हैं; अधिकारियों को आपात स्थिति के लिए तैयार रहना चाहिए।

Web Title : Scorching Summer Ahead? Heatwave Predictions and El Nino Concerns in Maharashtra

Web Summary : Maharashtra braces for a hotter-than-average summer, warns experts. Heatwaves are likely, especially in Marathwada, Vidarbha, and central Maharashtra. El Nino development is uncertain, but high temperatures are expected. Water scarcity and power outages are potential consequences; authorities should prepare for emergencies.