Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > नीरा खोऱ्यातील वीर, भाटघर, नीरा देवघर व गुंजवणी धरणांमध्ये किती पाणीसाठा? वाचा सविस्तर आकडेवारी

नीरा खोऱ्यातील वीर, भाटघर, नीरा देवघर व गुंजवणी धरणांमध्ये किती पाणीसाठा? वाचा सविस्तर आकडेवारी

How much water is stored in Veer, Bhatghar, Neera Deoghar and Gunjawani dams in Neera Valley? Read detailed statistics | नीरा खोऱ्यातील वीर, भाटघर, नीरा देवघर व गुंजवणी धरणांमध्ये किती पाणीसाठा? वाचा सविस्तर आकडेवारी

नीरा खोऱ्यातील वीर, भाटघर, नीरा देवघर व गुंजवणी धरणांमध्ये किती पाणीसाठा? वाचा सविस्तर आकडेवारी

nira khore dam water capacity नीरा खोऱ्यातील माळशिरस, या लाभक्षेत्रासाठी फलटण, इंदापूर, पंढरपूर तालुक्यातील दिलासादायक बातमी आहे.

nira khore dam water capacity नीरा खोऱ्यातील माळशिरस, या लाभक्षेत्रासाठी फलटण, इंदापूर, पंढरपूर तालुक्यातील दिलासादायक बातमी आहे.

नातेपुते : नीरा खोऱ्यातील माळशिरस, या लाभ क्षेत्रासाठी फलटण, इंदापूर, पंढरपूर तालुक्यातील दिलासादायक बातमी आहे.

खोऱ्यातील वीर, भाटघर, नीरा देवघर, गुंजवणी या प्रमुख चार धरणांमध्ये सध्या १५.४४१ टीएमसी म्हणजेच ३१.९५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे, अशी माहिती वीर धरण अभियंता राहुल मिसाळ यानी दिली.

विशेष म्हणजे, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ दिसून येत असून, गतवर्षी याच तारखेला खोऱ्यात ११.२६८ टीएमसी (२३.३२ टक्के) पाणीसाठा शिल्लक होता.

गेल्या २४ तासांत पावसाची नोंद शून्य मिमी झाली आहे. परिणामी, नवीन पाण्याची आवक सध्या बंद आहे.

मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सुमारे ४ टीएमसी पाणी अधिक असल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुसह्य होण्याची चिन्हे आहेत.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन केले जात आहे.

बुधवारी (दि. ६ मे २०२६) सकाळी ६:०० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, धरणनिहाय पाणीसाठ्याची स्थिती खालीलप्रमाणे आहे.

◼️ भाटघर धरणात सध्या १ ५.९८६ टीएमसी (२५.४७ टक्के) पाणीसाठा असून पॉवर हाऊसमधून २०८२ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
◼️ नीरा देवघर धरणात ३.६१५ टीएमसी (३०.८२%) साठा असून पॉवर हाऊसद्वारे ७५० क्युसेक पाणी सोडले जात आहे.
◼️ वीर धरणात ४.९०८ टीएमसी ६ (५२.१७%) पाणीसाठा आहे. धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे १,५५० क्युसेक आणि डाव्या कालव्याद्वारे ८२७ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.
◼️ गुंजवणी धरणात ०.९३१ टीएमसी (२५.२४%) पाणीसाठा शिल्लक आहे.

खंडित वीजपुरवठ्यामुळे पिके जळू लागली
माळशिरस तालुक्यातील ग्रामीण भागात काही प्रमाणात विहिरीला पाणी असून परंतु विजेचा खेळ खंडोबा सुरू असल्यामुळे वीज नसल्यामुळे शेताला पाणी देतात देत नाही, त्यामुळे उसासारखी नगदी पिके सुद्धा जळू लागल्याचे दिसून येत आहे.

अधिक वाचा: पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांना १० टक्के परतावा; फळझाडे, गोठा व घर यासांठी किती रुपये मिळणार?

Web Title : नीरा घाटी बांधों का जल स्तर: भाटघर, नीरा देवघर, गुंजवानी विवरण

Web Summary : नीरा घाटी के बांधों में 31.95% जल भंडार है, जो पिछले वर्ष से काफी अधिक है। भाटघर, नीरा देवघर, वीर और गुंजवानी बांधों का वर्तमान स्तर सिंचाई और पीने के पानी के लिए बेहतर स्थिति सुनिश्चित करता है, हाल ही में बारिश न होने के बावजूद। हालांकि, मालशिरस में बिजली कटौती से फसलों को खतरा है।

Web Title : Nira Valley Dams' Water Stock: Bhatghar, Nira Deoghar, Gunjvani Details

Web Summary : Nira Valley dams hold 31.95% water stock, significantly higher than last year. Bhatghar, Nira Deoghar, Veer, and Gunjvani dams' current levels ensure better conditions for irrigation and drinking water, despite no recent rainfall. Power outages, however, threaten crops in Malshiras.