Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > गतवर्षीच्या तुलनेत भाटघर व नीरा देवघर धरणात किती पाणीसाठा; यंदा शेतीला पाणी मिळणार का?

गतवर्षीच्या तुलनेत भाटघर व नीरा देवघर धरणात किती पाणीसाठा; यंदा शेतीला पाणी मिळणार का?

How much water is stored in Bhatghar and Neera Deoghar dams compared to last year; Will agriculture get water this year? | गतवर्षीच्या तुलनेत भाटघर व नीरा देवघर धरणात किती पाणीसाठा; यंदा शेतीला पाणी मिळणार का?

गतवर्षीच्या तुलनेत भाटघर व नीरा देवघर धरणात किती पाणीसाठा; यंदा शेतीला पाणी मिळणार का?

maharashtra dam water storage भोर तालुक्यातील भाटघर आणि नीरा देवघर या दोन्ही धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.

maharashtra dam water storage भोर तालुक्यातील भाटघर आणि नीरा देवघर या दोन्ही धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.

भोर : भोर तालुक्यातील भाटघर आणि नीरा देवघर या दोन्ही धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.

सद्यःस्थितीत भाटघर धरणात ४४.५९ टक्के, तर नीरा देवघर धरणात ४०.९४ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी १७ एप्रिलला भाटघरमध्ये २७.०६ टक्के व नीरा देवघर धरणात १८.७७ टक्के पाणीसाठा होता.

याचा अर्थ भाटघर धरणात यावर्षी दीड पट अधिक व नीरा देवघर धरणात दुपटीने अधिक पाणीसाठा आहे. भाटघर धरणाची साठवण क्षमता २३.७५ टीएमसी असून नीरा देवघर धरणाची क्षमता १२ टीएमसी आहे.

यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा पाच ते सहा महिन्यांनी अधिक काळ पडल्यामुळे दोन्ही धरणे पूर्णक्षमतेने भरलेली दिसत होती.

भाटघर धरण हे येळवंडी नदीवर बांधलेले आहे तर नीरा देवघर धरण नीरा नदीवर आहे. नीरा नदीचे पाणी भाटघर जलविद्युत केंद्रानंतर येळवंडी नदी आणि नीरा नदीच्या संगमावर मिळते.

नीरा नदी संगम झाल्यानंतर काही किलोमीटर वाहून वीर धरणात पोहोचते. वीर धरणातून उजवा आणि डावा कालवा यांद्वारे पूर्वेकडील भागाला शेती व सिंचनासाठी पाणीपुरवठा होतो.

यावर्षी धरणातील समाधानकारक पाणीसाठ्यामुळे उन्हाळ्यात पूर्वेकडील शेतकऱ्यांच्या पिकांसाठी चिंता मिटण्याची शक्यता आहे.

त्यामुळे रब्बी व बागायत पिकांसाठी शेतकरी समाधानी आहेत. गेल्या वर्षी धरणातील कमी पाणीसाठ्यामुळे शेतकऱ्यांना विपरीत परिस्थितीला सामोरे जावे लागले होते.

शेतकरीवर्गात समाधान
◼️ भाटघर, नीरा देवघर आणि गुंजवणी या तीन धरणांचे पाणी वीर धरणाला मिळते.
◼️ वीर धरणातून पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतील भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर, खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोला या नऊ तालुक्यांना सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा होतो.
◼️ यावर्षी गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

अधिक वाचा: बदललेल्या शक्तीपीठ महामार्गामुळे 'या' ३४ गावांतील जमिनीच्या किमतीत दुपटीने वाढ; एकरी काय दर?

Web Title : भाटघर, नीरा देवघर बांधों में अधिक पानी; सिंचाई की उम्मीद?

Web Summary : भाटघर और नीरा देवघर बांधों में पिछले साल की तुलना में अधिक पानी है, जिससे पूर्वी क्षेत्र में सिंचाई की उम्मीदें बढ़ गई हैं। बढ़ी हुई बारिश से बांध भर गए, जिससे पुणे, सतारा और सोलापुर जिलों को पानी की आपूर्ति करने वाले वीर बांध पर निर्भर किसानों को लाभ हुआ। किसान संतुष्टि व्यक्त करते हैं।

Web Title : Bhatghar, Nira Devghar Dams Have More Water; Irrigation Expected?

Web Summary : Bhatghar and Nira Devghar dams have more water than last year, raising hopes for irrigation in the eastern region. Increased rainfall filled the dams, benefiting farmers dependent on the Veer dam for water supply to Pune, Satara, and Solapur districts. Farmers express satisfaction.