Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > शेतकऱ्यांनो पिक काढणीची कामे उरकून घ्या; राज्यात 'ह्या' तारखेला पुन्हा गारपिटीची शक्यता

शेतकऱ्यांनो पिक काढणीची कामे उरकून घ्या; राज्यात 'ह्या' तारखेला पुन्हा गारपिटीची शक्यता

Farmers, complete your harvest work; There is a possibility of hailstorm again in the state on 'this' date | शेतकऱ्यांनो पिक काढणीची कामे उरकून घ्या; राज्यात 'ह्या' तारखेला पुन्हा गारपिटीची शक्यता

शेतकऱ्यांनो पिक काढणीची कामे उरकून घ्या; राज्यात 'ह्या' तारखेला पुन्हा गारपिटीची शक्यता

Maharashtra Weather Update सध्या राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ हवामान असून ही स्थिती या आठवड्यात कायम राहण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update सध्या राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ हवामान असून ही स्थिती या आठवड्यात कायम राहण्याची शक्यता आहे.

सध्या राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ हवामान असून ही स्थिती या आठवड्यात कायम राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या दक्षिण भागांमध्ये दुपारनंतर स्थानिक स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो.

हा पाऊस प्रामुख्याने कर्नाटक व तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्रविदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये राहण्याची शक्यता आहे.

दि. ३० मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. उर्वरित विदर्भात देखील हवामानात बदल दिसू शकतो.

या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही. ३१ मार्च रोजीदेखील राज्याच्या काही भागांमध्ये या हवामानाचा परिणाम दिसू शकतो.

शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत.

सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी.

तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

अधिक वाचा: रॉकेल वाटपाचा जीआर आला; आता एका रेशन कार्डवर नक्की किती रॉकेल मिळणार? वाचा सविस्तर

Web Title : किसानों, फसल कटाई जल्दी करें! महाराष्ट्र में इस तारीख को ओलावृष्टि की संभावना।

Web Summary : किसानों को सलाह दी जाती है कि वे जल्द ही फसल कटाई पूरी कर लें क्योंकि महाराष्ट्र के कुछ हिस्सों में 30-31 मार्च के आसपास गरज, बारिश और ओलावृष्टि हो सकती है। कृषि विभाग किसानों से काटी गई फसलों को संभावित नुकसान से बचाने का आग्रह करता है।

Web Title : Farmers, Harvest Quickly! Hailstorm Expected in Maharashtra on This Date.

Web Summary : Farmers are advised to quickly complete harvesting as parts of Maharashtra may experience thunderstorms, rain, and hailstorms around March 30-31. The agriculture department urges farmers to safeguard harvested crops from potential damage.