Lokmat Agro >हवामान > वाऱ्याच्या द्रोणीय रेषेमुळे पुढील एक ते दोन दिवसांत राज्यात या ठिकाणी पाऊस

वाऱ्याच्या द्रोणीय रेषेमुळे पुढील एक ते दोन दिवसांत राज्यात या ठिकाणी पाऊस

Due to the trough of the wind, rain will occur in these places in the state in the next one to two days | वाऱ्याच्या द्रोणीय रेषेमुळे पुढील एक ते दोन दिवसांत राज्यात या ठिकाणी पाऊस

वाऱ्याच्या द्रोणीय रेषेमुळे पुढील एक ते दोन दिवसांत राज्यात या ठिकाणी पाऊस

Maharashtra Weather Update वाऱ्याची द्रोणीय रेषा विदर्भ आणि मराठवाड्यामार्गे जात असून, पुढील एक ते दोन दिवसांत पावसासाठी पोषक वातावरण आहे.

Maharashtra Weather Update वाऱ्याची द्रोणीय रेषा विदर्भ आणि मराठवाड्यामार्गे जात असून, पुढील एक ते दोन दिवसांत पावसासाठी पोषक वातावरण आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे: वाऱ्याची द्रोणीय रेषा विदर्भ आणि मराठवाड्यामार्गे जात असून, पुढील एक ते दोन दिवसांत पावसासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

मंगळवारी (दि. १५) कोकणात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाची शक्यता आहे. सांगली, सोलापूर, नागपूर, लातूर, धाराशिव या भागात तुरळक ठिकाणी हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.

विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया येथे पुढील दोन ते तीन दिवस विजांच्या कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे त्या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्याच्या अंतर्गत भागात कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

पुणे व परिसरातील हवामान अंशतः ढगाळ राहण्याची व मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अकोला येथे ४३ अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमान नोंदविले गेले.

मध्य महाराष्ट्रातील जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक आदी भागांतील कमाल तापमानाचा पारा एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढला आहे.

सोलापूर मध्ये ४२. २ अंश सेल्सिअसची नोंद झाली. विदर्भात अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळ मधील कमाल तापमानाचा पारा चाळिशीच्या वरच आहे.

राज्यातील कमाल तापमान पुढीलप्रमाणे
पुणे ३९.२
जळगाव ४१.५
नाशिक ३८.१
कोल्हापूर ३९.६
सोलापूर ४२.२
छत्रपती संभाजीनगर ४०.८
परभणी ४१.६
अमरावती ४१.४
चंद्रपूर ४२.८
नागपूर ३९.८
वर्धा ३९.८
यवतमाळ ४१.४

अधिक वाचा: सिंधुदुर्ग जिल्ह्यात या पिकातून शेतीत आली समृद्धी, होतेय ६० कोटी रुपयांची उलाढाल; वाचा सविस्तर

Web Title: Due to the trough of the wind, rain will occur in these places in the state in the next one to two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.