Join us

सिंचनासाठी उजनीतून दोन पाणी पाळ्या सोडण्याचा निर्णय; किती दिवस सुरू राहणार विसर्ग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 12:23 IST

Ujani Dam सिंचनासाठी उजनी धरणातून आजपासून कालव्यात पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा मंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

सोलापूर : सिंचनासाठी उजनी धरणातून आजपासून कालव्यात पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा मंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

जिल्ह्यातील आमदारांनी केलेल्या मागणीनुसार उजवा डावा कालव्यात सलग साठ दिवस पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उजनी पाणी वापर सल्लागार समितीची बैठक मंत्रालयात जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली.

बैठकीला सोलापूर पालकमंत्री जयकुमार गोरे, क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे, आमदार दिलीप सोपल, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजू खरे, आमदार नारायण पाटील, आमदार अभिजीत पाटील, आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे यांची उपस्थिती होती. 

उजनी धरणातून जिल्ह्यातील शेती, साखर कारखाने, प्रक्रिया उद्योग, एमआयडीसी, पिण्यासाठी पाणी वापरले जाते. शेती, पिण्याचा पाणीपुरवठा यांची पाणीपट्टी वसुलीची मोहीम राबविली जाते.

मात्र, या तुलनेत साखर कारखान्यांची पाणीपट्टी वसूल होत नाही याकडे उपस्थितांनी लक्ष वेधले. ही कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टीची रक्कम रक्कम असून ती तातडीने वसूल करण्याचे आदेश दिले.

उजनीतून उजवा आणि डाव्या कालव्याद्वारे दोन पाणी पाळ्या सोडण्याचा निर्णय झाला. पहिली पाळी गुरुवार दि. ६ मार्चपासून तर दुसरी पाळी दि. १५ एप्रिलपासून असणार आहे.

साखर कारखान्यांची पाणीपट्टी वसूल करावर्षानुवर्षे साखर कारखानदारांकडे प्रलंबित असलेली पाणीपट्टी वसुलीचे आदेश राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज बोलावलेल्या सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.

बरग्यांची दुरुस्ती करणारभीमा आणि सीना नद्यावर बांधलेले बंधारे ४० वर्षांपूर्वीचे आहेत. जुन्या काळात बांधलेले हे बंधारे सातत्याने नादुरूस्त होत आहेत. त्यावर टाकलेले बरगे नादुरूस्त असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असते याकडे जलसंपदा मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. सदरचे नादुरूस्त बरगे तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश दिले.

अधिक वाचा: खोडवा उसाचे पिक घेतल्याने उत्पादन खर्चात कशी होते मोठी बचत? वाचा सविस्तर

टॅग्स :उजनी धरणधरणपाणीसोलापूरमंत्रीराधाकृष्ण विखे पाटीलशेतकरीशेतीसाखर कारखानेनदी