Join us

तयार होतोय कमी दाबाचा पट्टा; राज्यात पुढील दोन दिवस या भागात मुसळधार पाऊस होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 09:10 IST

मध्य भारतावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून याच्या प्रभावामुळे राज्यातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मुंबई : मध्य भारतावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून याच्या प्रभावामुळे राज्यातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), मुंबई महानगर प्रदेश आणि मराठवाड्यात (प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण भाग) १८ ते १९ ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्यात कोकणातील सर्वच जिल्हे; नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, ठाणे, मुंबई, सोलापूर, धाराशिव येथे जोरदार पाऊस होईल.

तसेच लातूर येथे जोरदार पाऊस होईल. खान्देश व मराठवाड्यातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.

या भागात रेड अलर्टपुढील २४ तासासाठी पुणे घाट भागात रेड अलर्ट देण्यात आला असून पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, या जिल्ह्यात तसेच सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

अधिक वाचा: e Pik Pahani : आता पिक पाहणी होणार झटपट; वापरा अपडेटेड व्हर्जनचे 'हे' मोबाईल अ‍ॅप

टॅग्स :पाऊसकोकणमहाराष्ट्रविदर्भमराठवाडामुंबईपुणेरत्नागिरीसिंधुदुर्ग