टेंभुर्णी : Ujani Dam Water Level भीमा खोऱ्यात गेल्या तीन दिवसांत मुसळधार पाऊस सुरू असल्याने १२ धरणातून विसर्ग सोडण्यात येत आहे.
दौंड येथील पाणी पातळी वाढत चालल्याने उजनी धरणातून भीमा नदीत ५० हजार क्युसेक विसर्ग सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तर दौंड येथून उजनीत ४१ हजार ६८८ क्युसेक विसर्ग मिसळत आहे.
उजनी धरणाचीपाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी जेवढा दौंड येथून विसर्ग उजनीत मिसळत आहे. तेवढाच उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी उजनी धरणाची पाणी पातळी ९७.१३ टक्क्यांपर्यत पोहोचली होती.
खडकवासला धरणातून १५ हजार ३७६ क्युसेक विसर्ग मुळा मुठा नदीत सोडण्यात येत आहे. तर पुणे बंडगार्डन येथून २१ हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे.
दोन दिवसांपासून उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात वाढ होत गेल्याने, शनिवारी सायंकाळपासून उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे.
सध्या नीरा नृसिंहपूर येथे ४५ हजार क्युसेक विसर्ग सुरू असून पंढरपूर येथील पाणी पातळीत सोमवारपासून वाढ होणार आहे.
उजनीतून मुख्य कालवा १ हजार १०० क्युसेक, भीमा सीना जोड कालवा ४०० क्युसेक, वीज निर्मिती १ हजार ६०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. १ जूनपासून २१४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
यंदा मे महिन्यात झालेल्या पावसांमुळे उजनी धरणाची पातळी झपाट्याने वाढली. आषाढी वारीच्या काळात दर ७५ टक्क्यांवर स्थिर ठेवण्यासाठी भीमेत पाणी सोडल्यात आहे.
त्यानंतर आताही धरण ९७ टक्के भरले आहे. त्यामुळे दौंडहून जेवढा विसर्ग येईल, तेवढा विसर्ग भीमा नदीत सोडला जात आहे.
धरणाची पाणी स्थिती (रविवार, सायंकाळी ६ वाजता)
एकूण पाणी पातळी - ४९६.७०० मीटर
एकूण पाणीसाठा - ३,२७६.५२ घन मीटर
उपयुक्त जलसाठा - १,४७३.५१ घन मीटर
टक्केवारी - ९७.१३ टक्के
भीमा खोऱ्यातील १२ धरणातून विसर्ग
◼️ खडकवासला - १५ हजार ३७६, चासकमान - ९ हजार ५२०, मुळशी - ९ हजार, डिंभे - ८ हजार, वारसगाव - ६ हजार ५६१, वडिवळे - ४ हजार २२३ क्युसेक विसर्ग मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत आहे.
◼️ घोड - ३ हजार ५००, पानशेतमधून - ३ हजार, चिल्हेवाडी - २ हजार ३१७, आंध्र - १ हजार ३८३, कळमोडी - १ हजार ५०८, वडज - १ हजार २५० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.
अधिक वाचा: सातबारा उताऱ्यावरील 'ह्या' नोंदीसाठी महत्वपूर्ण निर्णय; आता एकही अर्ज पेंडीग राहणार नाही