Join us

राज्यातील ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग; जवळपास सर्वच धरणे तुडुंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 11:33 IST

Maharashtra Water Update : गेल्या सहा महिन्यांत राज्यात सरासरीपेक्षा २० टक्के जास्त पाऊस झाला असून, धरणे तुडुंब भरली आहेत. राज्यातील ३५ धरणांमधून एकूण तीन लाख १८ हजार ८५९ क्यूसेक इतका विसर्ग विविध नद्यांमध्ये सुरु असल्याने नद्यांना पूर आला आहे.

बाळासाहेब बोचरे

गेल्या सहा महिन्यांत राज्यात सरासरीपेक्षा २० टक्के जास्त पाऊस झाला असून, धरणे तुडुंब भरली आहेत. राज्यातील ३५ धरणांमधून एकूण तीन लाख १८ हजार ८५९ क्यूसेक इतका विसर्ग विविध नद्यांमध्ये सुरु असल्याने नद्यांना पूर आला आहे.

गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाल्याने पिकांची मोठी हानी झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसात पावसाचा जोर कमी होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

दरम्यान राज्यात १३८ मोठी धरणे आहेत. त्यामध्ये ९७ टक्के जलसाठा आहे. २६० मध्यम प्रकल्प असून, त्यामध्ये सरासरी ८० टक्के साठा आहे. त्याचबरोबर लघुप्रकल्प २५९९ असून, त्यामध्ये ६१ टक्के साठा आहे. राज्यातील सर्व २९९७ लहान-मोठ्या प्रकल्पांत आजमितीला ८९ टक्के जलसाठा आहे.

मोठ्या धरणांमध्ये ९७ टक्के जलसाठा, विसर्ग सुरू

धरणजिल्हाजलसाठाविसर्ग (क्युसेक)नदी
भातसाठाणे९९.५६ टक्के७४३भातसा
जायकवाडी छत्रपती संभाजीनगर९९.२३ टक्के१४६७०गोदावरी
निम्न दूधना परभणी७५.०५ टक्के२६७९ दूधना
पूर्णा येलदरी परभणी९७.३१ टक्के४२१९ पूर्णा
माजलगावबीड९६.१५ टक्के१३९०२ सिंदफणा
मांजराबीड१०० टक्के१४५०८ मांजरा
उर्ध्व पैनगंगा  नांदेड९९.५१ टक्के८४८४ पैनगंगा 
तेरणाधाराशिव९८.४५ टक्के३८२५ तेरणा
पेंच तोतलाडोहनागपूर९९.१५ टक्के१५६६३ पेंच
इटियाडोहगोंदिया१०० टक्के१०१७ गाढवी
गोसी खुर्द भंडारा६२.५१ टक्के५९४२७ वैनगंगा
निम्न वर्धा वर्धा७८.६१ टक्के१९२७ वर्धा
उर्ध्व वर्धा अमरावती९७.२३ टक्के४३०८ वर्धा
बेंबळा यवतमाळ८८.४१ टक्के३५३१ बेंबळा
अरुणावतीयवतमाळ९६.१२ टक्के१२०१ अरुणावती
पेनटाकळी बुलढाणा ९४.२१ टक्के७३७ पेनगंगा
खडकपूर्णाबुलढाणा९८.४५ टक्के१२२८१ पूर्णा
इसापूर हिंगोली १०० टक्के२२०६ पैनगंगा
सिद्धेश्वरहिंगोली १०० टक्के१८००० पूर्णा
दारणानाशिक १०० टक्के८५० दारणा
गंगापूरनाशिक ९८.८५ टक्के६९८ गोदावरी 
गिरणाजळगाव१०० टक्के२४७६ गिरणा
हतनुरजळगाव ६७.०६ टक्के५५१२३ तापी 
वाघूरजळगाव९७.९१२ टक्के७५८ वाघूर
मुळाअहिल्यानगर१०० टक्के४००० प्रवरा 
डिंभेपुणे१०० टक्के७७६८ घोड
वरसगाव पुणे१०० टक्के७४२ मुळा 
खडकवासला पुणे९८.४१ टक्के४६६१ मुळा 
पानशेत पुणे१०० टक्के११३० मुळा
घोड पुणे १००० टक्के ३००१ घोड 
आंद्रा पुणे १०० टक्के ३५३ अंबी 
वीर सातारा १०० टक्के ४६२६ नीरा 
उजनी सोलापूर १०० टक्के २४९९९ भीमा 
वारणा सांगली ९९.४८ टक्के ३९९० वारणा 
कोयना सातारा  १०० टक्के ८५०० कृष्णा 

सोलापूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत अतिवृष्टी, पिके गेली

अक्कलकोट/हिंगोली : शनिवारी पहाटे अक्कलकोट (जि. सोलापूर) तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शिरवळ-बादोले, हालचिंचोळी येथील डांबरी रस्ता वाहून गेला आहे. तसेच काही गावच्या ओढ्याचे पाणी है पुलावरून वाहत आहे. त्यामुळे रस्ते बंद झाले असून, गावाचा संपर्क तुटला आहे. सांगोला तालुक्यात गुरुवारी रात्री ते शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत पाऊस झाला. पिके पाण्याखाली गेली. परभणी जिल्ह्यातील दोन मंडळांत शनिवारी अतिवृष्टीची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्यातील इसापूर व सिद्धेश्वर धरणाचे दरवाजे उघडले आहेत.

सरासरी ९०% पाणीसाठा 

विभाग धरणे पाणीसाठा 
नाशिक ५३७ ८४.३०%
अमरावती २६४ ८८.८७%
नागपूर ३८३ ८७.६०%
छत्रपती संभाजीनगर ९२० ८३.५१%
पुणे ७२० ९२.७२%
कोकण १७३ ९३.९२%

हेही वाचा : प्राण्यांच्या संपर्कातून पसरणारा जीवघेणा आजार; जाणून घ्या ब्रुसेलोसिसची लक्षणं, कारणं आणि उपचार

टॅग्स :पाणीधरणनदीमहाराष्ट्रशेती क्षेत्रनागपूरअमरावतीपुणेनाशिकछत्रपती संभाजीनगर