Lokmat Agro >लै भारी > ज्या दिवशी लिलाव त्याच दिवशी पट्टीचे पैसे; महाराष्ट्रात नावारूपाला येतंय हे कांद्याचे मार्केट

ज्या दिवशी लिलाव त्याच दिवशी पट्टीचे पैसे; महाराष्ट्रात नावारूपाला येतंय हे कांद्याचे मार्केट

The money of onion auction is paid on the same day; This onion market is becoming famous in Maharashtra | ज्या दिवशी लिलाव त्याच दिवशी पट्टीचे पैसे; महाराष्ट्रात नावारूपाला येतंय हे कांद्याचे मार्केट

ज्या दिवशी लिलाव त्याच दिवशी पट्टीचे पैसे; महाराष्ट्रात नावारूपाला येतंय हे कांद्याचे मार्केट

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना वर्ष १९५९ मध्ये झाली आहे. दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यासाठी ही बाजार समिती आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना वर्ष १९५९ मध्ये झाली आहे. दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यासाठी ही बाजार समिती आहे.

शेअर :

Join us
Join usNext

विठ्ठल खेळगी
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना वर्ष १९५९ मध्ये झाली आहे. दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यासाठी ही बाजार समिती आहे.

या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील उत्तर सोलापूर तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ६८,३०३ हेक्टर व दक्षिण सोलापूर तालुक्याचे १,१९,४६३ हेक्टर असे एकूण १,८७,७६६ हेक्टर इतके क्षेत्र आहे.

बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात खरीप हंगामात जिरायती क्षेत्रात प्रामुख्याने बाजरी, तूर, मका व रब्बी हंगामात प्रामुख्याने ज्वारी, गहू, हरभरा, करडी इत्यादी पिके घेतली जातात व बागायती क्षेत्रात प्रामुख्याने ऊस, द्राक्षे, डाळिंब व इतर फळे व भाजीपाला इत्यादी पिके घेतली जातात.

सोलापूर जिल्ह्यावर उजनी धरणाची कृपा झाल्याने ज्या पद्धतीने उसाचे क्षेत्र वाढले त्या पद्धतीने इतर नगदी पिके आणि फळभाज्यांचेही क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले.

एकीकडे सर्वाधिक साखर कारखान्यांची संख्या सोलापुरात आहे. तर दुसरीकडे भाजीपाल्यामध्ये कांद्याने देशात स्थान निर्माण केले आहे. नाशिक, लासलगावला मागे टाकून सोलापूरच्या कांदा मार्केटमध्ये ठसा उमटविला.

चांगला भाव, दळणवळणाची सोय आणि विश्वासार्हतेच्या जोरावर दिवसेंदिवस कांदा मार्केट वाढत आहे. त्यामुळे सोलापूरचे नाव देशभरात गेले आहे. 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थानपा वर्ष १९५९ मध्ये झाली आहे. दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यासाठी ही बाजार समिती आहे.

या बाजार समितीचे कार्यक्षेत्रातील उत्तर सोलापूर तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ६८,३०३ हेक्टर व दक्षिण सोलापूर तालुक्याचे १,१९,४६३ हेक्टर असे एकूण १,८७,७६६ हेक्टर इतके क्षेत्र आहे.

बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात खरीप हंगामात जिरायती क्षेत्रात प्रामुख्याने बाजरी, तूर, मका व रब्बी हंगामात प्रामुख्याने ज्वारी, गहू, हरभरा, करडी इत्यादी पिके घेतली जातात व बागायती क्षेत्रात प्रामुख्याने ऊस, द्राक्षे, डाळिंब व इतर फळे व भाजीपाला इत्यादी पिके घेतली जातात.

भाजीपाला मार्केटमध्ये कांदा व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे. सेलहाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक असते. दररोज सायंकाळी शेतकरी कांदा घेऊन येतात आणि सकाळी ११ वाजेपर्यंत लिलावाची प्रक्रिया पार पडते. दुपारी पट्टी घेऊन शेतकरी घरी जातात.

आवक वाढल्यानंतर लिलावाला विलंब होतो. शेतकऱ्यांना वेळेत पट्टी मिळत असल्याने अहिल्यानगर, पुणे, नाशिक, धुळे, सातारा या जिल्ह्यांसह कर्नाटकातील इंडी, विजयपूर, कलबुर्गी, आळंद, बिदर आदी भागात वर्षभर कांदा विक्रीला येतो.

ज्या दिवशी लिलाव त्याच दिवशी पट्टी अशी पद्धत आहे. आवक वाढल्यानंतर शेतकऱ्यांना धनादेश देतात. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांच्यात विश्वासाचं नातं तयार झालं आहे. 

लिलावानंतर तेलंगणा, हैदराबाद, विजयवाडा, जहिराबाद, निजामाबाद, तामिळनाडूमधील चेन्नई, सेडम, कुभकोलम, पोलाची, कर्नाटकातील बंगलुरु, चित्रदुर्ग, तुमकुर, राणीबेन्नूर व कोलकातापर्यंत कांदा जातो व्यापाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

वर्षाला सरासरी ७ ते ८ लाख क्विंटल कांद्याची आवक होत असून, उलाढालही एक कोटीपेक्षा जास्त होत आहे. हा आकडा इतर बाजार समितींच्या तुलनेत किती तरी पटींनी मोठा आहे. 

लवकरच स्वतंत्र कांदा मार्केट 
मागील अनेक वर्षांपासून कांद्यासाठी स्वतंत्र मार्केट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. यापूर्वी बाजार समितीच्या वतीने कांदा मार्केटसाठी जागा खरेदी करण्यास परवानगी मागितली आहे. मात्र, पणन विभागाकडून मंजुरी मिळाली नाही. आता नव्याने प्रस्ताव पाठिवला आहे. बाजार समितीच्या बाजूला कृषी विभागाची जागा आहे. जवळपास ४० एकर जमीन आहे. ती जागा शासनाचीच असल्याने कांदा मार्केटसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी पणन विभागाकडे करण्यात आलेली आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास लवकरच कांदा मार्केट शहराबाहेर जाणार आहे. 

शेतकऱ्यांना जेवणाची व्यवस्था 
बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना रात्री मुक्काम करावा लागतो. अशा शेतकऱ्यांसाठी बाजार समितीत अत्यल्प दरात जेवणाची सोय करण्यात येते. शेतकऱ्यांना शेतकरी भवन उभारण्याचा प्रस्ताव तयार आहे. शिवाय शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आवक चाढल्यानंतर गाड्या लावण्यासाठी सोय करण्यात आली आहे. शिवाय ज्या वेळेत आवक वाढलेली असते त्यावेळेस रात्रपाळीला कर्मचारी असतात.

अधिक वाचा: भारतातील पहिला शेतकरी मालकीचा साखर कारखाना कुठे सुरु झाला? अन् कशी झाली साखर क्रांती? वाचा सविस्तर

Web Title: The money of onion auction is paid on the same day; This onion market is becoming famous in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.