आपल्या राज्यात लागवडीसाठी शिफारस केलेल्या सोयाबीनच्या soybean jati सुधारित वाणांची माहिती पुरविण्याच्या उद्देशाने तसेच या पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी पेरणी करण्यापूर्वी शेतकर्यांनी कोणते वाण निवडावेत.
महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस केलेल्या सोयाबीनच्या सुधारित जाती
१) एम ए सी एस १४६० (MACS 1460)
• ८९-९१ दिवसांत पक्व होणारा वाण.
• फुलांचा रंग: पांढरा.
• जास्त उत्पादन क्षमता: २२-३८ क्विं./हे.
• शेंगा फुटण्यास प्रतिरोधक.
• विविध किडी व रोगांना मध्यम प्रतिबंधक.
• मध्य व पश्चिम महाराष्ट्रात लागवडीस योग्य.
२) एम ए सी एस १५२० (MACS 1520)
• जास्त उत्पादन क्षमता: २१-२९ क्विं./हे.
• फुलांचा रंग: जांभळा.
• कालावधी: १०० दिवस.
• शेंगा फुटण्यास प्रतिरोधक.
• प्रकाश व उष्णतेस असंवेदनशील.
• मराठवाडा व विदर्भात लागवडीस योग्य.
३) एमएसीएस एनआरसी १६६७ (MACS NRC 1667)
• कुणीत्झ ट्रिप्सिन इन्हीबीटर मुक्त (KTI free) वाण.
• एमएसीएस ४५० या जुन्या वाणाचा मुलत: व्युत्पन्न वाण (Essentially Derived Variety)
• उत्पादन क्षमता: २०-२१ क्विं./हे.
• फुलांचा रंग: जांभळा.
• कालावधी: ९६-९८ दिवस.
• सोया खाद्य पदार्थ व पशु खाद्य उद्योगासाठी उपयुक्त.
• पश्चिम महाराष्ट्र व दक्षिण भारतात लागवडीस योग्य.
४) के डी एस ९९२ (फुले दूर्वा)
• अधिक उत्पादनक्षमता: २५-३० क्विं./हे.
• कालावधी: १०० ते १०५ दिवस.
• फुलांचा रंग: जांभळा.
• तांबेरा रोगास प्रतिबंधक.
• शेंगा फुटण्यास प्रतिबंधक.
• दक्षिण महाराष्ट्रात लागवडीस योग्य.
५) के डी एस ७५३ (फुले किमया)
• उत्पादन क्षमता: २५-३० क्विं./हे.
• फुलांचा रंग: जांभळा.
• कालावधी: १०० ते १०५ दिवस.
• तांबेरा रोगास प्रतिबंधक.
• दक्षिण महाराष्ट्रात लागवडीस योग्य.
६) एम ए सी एस ११८८ (MACS 1188)
• जास्त उत्पादन क्षमता: २५-३५ क्विं./हे.
• फुलांचा रंग: पांढरा.
• कालावधी: १०५-११० दिवस.
• शेंगा फुटण्यास प्रतिरोधक.
• विविध किडी व रोगांना मध्यम प्रतिबंधक.
• पश्चिम व मध्य महाराष्ट्रात लागवडीस योग्य.
७) एम ए यु एस ६१२ (MAUS 612 )
• उत्पादन क्षमता: ३२-३५ क्विं./हे.
• फुलांचा रंग: जांभळा.
• कालावधी: ९३ ते ९८ दिवस.
• शेंगा फुटण्यास प्रतिबंधक.
• विविध रोग व किडींना प्रतिबंधक.
• विदर्भ व मराठवाडा विभागात लागवड शिफारस.
८) एम ए यु एस ७२५ (MAUS 725)
• उत्पादन क्षमता: २५-३१.५ क्विं./हे.
• फुलांचा रंग: जांभळा.
• कालावधी: ९० ते ९५ दिवस.
• २० ते २५ टक्के शेंगामध्ये चार दाणे येतात.
• विविध रोग व किडींना मध्यम प्रतिबंधक.
• मराठवाडा व विदर्भात लागवडीसाठी शिफारस.
९) पिडीकेव्ही अंबा (ए एम एस १००-३९)
• फुलाचा रंग: जांभळा.
• परिपक्वतेचा कालावधी: ९४-९६ दिवस.
• उत्पादकता: २८-३० क्विंटल/हेक्टर.
• मुळकुज/खोडकुज या रोगास मध्यम प्रतिकारक.
• शेंगा फुटण्यास प्रतिबंधक.
• मुळावर रायझोबियमच्या गाठींचे व गाठींमध्ये लेग-हीमोग्लोबिनचे प्रमाण जास्त.
१०) ए एम एस १००१ (पीडी केव्ही येलो गोल्ड)
• उत्पादन क्षमता: २२-२६ क्विं./हे.
• फुलांचा रंग: जांभळा.
• कालावधी: ९५ ते १०० दिवस.
• मुळकुज/खोडकुज व पिवळा मोझॅक या रोगांस मध्यम प्रतिकारक.
• विदर्भ व मराठवाडा विभागामध्ये लागवडीस योग्य.
- श्री. एस. ए. जायभाय
शास्त्रज्ञ ड - कृषि विद्यावेत्ता
अखिल भारतीय समन्वयित सोयाबीन संशोधन प्रकल्प, आघारकर संशोधन संस्था, पुणे
अधिक वाचा: शेतजमिनीवर गाळ कसा पसरवायचा? त्याच्या पद्धती कोणत्या? जाणून घ्या सविस्तर