Lokmat Agro >स्मार्ट शेती > Deep CCT; खोल सलग समपातळी चर कसे तयार करावेत? जाणून घ्या सविस्तर

Deep CCT; खोल सलग समपातळी चर कसे तयार करावेत? जाणून घ्या सविस्तर

Deep CCT; How to create Deep Continuous Contour Trenches? Learn in detail | Deep CCT; खोल सलग समपातळी चर कसे तयार करावेत? जाणून घ्या सविस्तर

Deep CCT; खोल सलग समपातळी चर कसे तयार करावेत? जाणून घ्या सविस्तर

Deep CCT राज्यात पाणलोट विकासाच्या विविध योजनेमध्ये मृद व जलसंधारणाचे विविध उपचार राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये शेतीस अयोग्य असलेल्या पडीक जमिनीवर सलग समपातळीचर हा उपचार राबविण्यात येतो.

Deep CCT राज्यात पाणलोट विकासाच्या विविध योजनेमध्ये मृद व जलसंधारणाचे विविध उपचार राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये शेतीस अयोग्य असलेल्या पडीक जमिनीवर सलग समपातळीचर हा उपचार राबविण्यात येतो.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात पाणलोट विकासाच्या विविध योजनेमध्ये मृद व जलसंधारणाचे विविध उपचार राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये शेतीस अयोग्य असलेल्या पडीक जमिनीवर सलग समपातळीचर हा उपचार राबविण्यात येतो.

यामध्ये ० ते ३३ टक्के उताराच्या जमिनीवर समपातळीत ६० सें.मी. रुंद व ३० सें.मी. खोल तसेच ६० सें.मी. रुंद व ४५ सें.मी. खोल या आकाराचे सलग समपातळी चर खोदण्यात येतात.

अशा सलग समपातळी चरांची खोली कमी असल्याने ते गाळाने लवकर बुजतात व पर्यायाने त्यामध्ये आवश्यक जलसंधारण होत नाही.

त्यामुळे ० ते ८ टक्के उताराच्या पडीक जमिनीवर १ मी. रुंद व १ मी. खोल आकाराचे खोल सलग समपातळी चर खोदल्यास डोंगर उतारावरुन वाहून जाणारे पाणी चरांमध्ये साठून चांगल्या प्रकारे मृद व जलसंधारण होते, असे दिसून आले आहे.

खोल सलग समपातळी चरामुळे होणारे फायदे
◼️ जमिनीवरील सुपीक मातीचा थर त्याच ठिकाणी अडवून ठेवणे व पाणी जमिनीत मुरविणे.
◼️ जमिनीची धूप होण्यास प्रतिबंध होतो. तसेच पाझर तलाव, नाला बांध इ. मध्ये गाळ साचण्यास प्रतिबंध होतो.
◼️ धरणामध्ये व बंधाऱ्यांमध्ये स्वच्छ पाण्याचा पुरवठा होतो.
◼️ डोंगरामध्ये पाणी मुरल्यामुळे भूगर्भामध्ये पाणी जास्त काळ टिकून राहते. त्यामुळे झाडोरा वाढीस मदत होते.
◼️ क्षेत्राचे आगीपासून संरक्षण होते.
◼️ रखवालदाराचा खर्च वाचतो.
◼️ जनावरांच्या उपद्रवापासून संरक्षण होते.
◼️ वृक्ष संवर्धन व गवत वाढ होण्यास मदत होते.

उद्देश
◼️ डोंगर माथ्यावरुन वेगाने वाहत येणाऱ्या पावसाच्या पाण्याची गती कमी करणे.
◼️ जमिनीची धूप कमी करणे.
◼️ वाहत येणारे पाणी जमिनीमध्ये जास्तीत जास्त मुरविणे.
◼️ पडीक जमिन उत्पादनक्षम बनवून काही प्रमाणात क्षेत्र वहितीखाली आणणे.
◼️ उपचार योग्य पडीक जमिनीचा विकास प्रभावीपणे व वेगाने करणे.

क्षेत्राची निवड
◼️ पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या गावातील पाणलोट क्षेत्रामध्येच हा कार्यक्रम राबवावा.
◼️ जमिनीचा उतार जास्तीत जास्त ८ टक्क्यांपर्यंत असावा.
◼️ जे शेतकरी सदरचा कार्यक्रम घेण्यास उत्सुक असतील, अशा लाभार्थ्यांच्या क्षेत्रातच हा कार्यक्रम राबविण्यात यावा.
◼️ नियमानुसार संबंधित शेतकऱ्यांची लेखी संमती घ्यावी.
◼️ लाभार्थीचे मालकीच्या क्षेत्रावर योजना राबवावयाची असल्याने लाभार्थीनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
◼️ चरा लगतच्या बांधावर निर्माण होणाऱ्या झाडा-झुडपांचे संरक्षण करणारा लाभार्थी असावा.

खोल सलग समपातळी चर खोदणे
◼️ निवडलेल्या क्षेत्रांमध्ये खोल स.स. चराची आखणी करुन प्रति हेक्टरी २४० मी. लांबीचे १ मी. रुंद व १ मी. खोल आकाराचे चर खोदण्यात यावेत.
◼️ दोन चरातील उभे अंतर ३३ मी. व प्रत्येक २० मी. लांबीचे चर खोदल्यानंतर जादा पाणी काढून देण्यासाठी दोन मी.चे अंतर (गॅप) सोडून दुसरा २० मी. लांबीचा चर काढावा. दोन चरातील अंतर (गॅप) ठेवताना सदर गॅप स्टॅगर्ड पध्दतीने येतील असे नियोजन करावे.
◼️ याकरिता निवडलेल्या गटातील चराची दुसरी ओळ खोदताना त्यातील सुरुवातीच्या चराची लांबी २० मी. ऐवजी १० मी. लांबीचे खोदून २ मी. अंतर (गॅप) सोडून त्याच समपातळीत २० मी. लांबीचा दुसरा चर खोदावा. अशा तऱ्हेने गटातील सर्व चर स्टॅगर्ड पध्दतीने खोदावेत.
◼️ चर खोदताना चरातून निघालेली माती उताराच्या (चराच्या खालील) बाजूस ३० सेमी. वर्म सोडून व्यवस्थितरित्या रचून त्याचा १ मी. उंचीचा बांध घालण्यात यावा.
◼️ चराच्या आखणीमध्ये झाडे झुडपे असल्यास ती तोडू नयेत किंवा मशिनरीने मोडू नयेत. याकरिता तेवढ्या भागामध्ये चर खोदण्यात येवू नये.
◼️ खोल सलग समतल चराच्या भरावावर १ मी. अंतरावर शिसम, शिसू, खैर, करंद, कडुलिंब, हिरडा, बेहडा, सुबाभूळ अशा प्रजातींच्या वृक्षांच्या बियाण्यांची लागवड करावी.
◼️ तसेच सिताफळ, बोर, चिंच, विलायती चिंच, कवठ, जांभूळ, करवंद, शेवगा, काजू इ. कोरडवाहू फळझाडांच्या बियाण्यांची पेरणी करावी किंवा शेतकऱ्यांच्या आवडी व इच्छेप्रमाणे बियाणांची लागवड करावी.
◼️ चराच्या भरावावर पूर्ण लांबीला हॅमाटा, पवना, मारवेल, डोंगरी गवत, मद्रास अंजन, शेडा, निल गवत अशा प्रजातीच्या गवताच्या बियाणांची पेरणी करावी.

अधिक वाचा: Construct CCT : सलग समतल चर सीसीटी कसे खोदावेत; जाणून घ्या सविस्तर

Web Title: Deep CCT; How to create Deep Continuous Contour Trenches? Learn in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.