Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > राज्यात ऊस गाळप व साखर उत्पादनात यंदा 'हे' दोन जिल्हे अव्वल; वाचा सविस्तर आकडेवारी

राज्यात ऊस गाळप व साखर उत्पादनात यंदा 'हे' दोन जिल्हे अव्वल; वाचा सविस्तर आकडेवारी

These two districts top the state in sugarcane crushing and sugar production this year; Read detailed statistics | राज्यात ऊस गाळप व साखर उत्पादनात यंदा 'हे' दोन जिल्हे अव्वल; वाचा सविस्तर आकडेवारी

राज्यात ऊस गाळप व साखर उत्पादनात यंदा 'हे' दोन जिल्हे अव्वल; वाचा सविस्तर आकडेवारी

राज्यातील १०३ सहकारी व १०७ खासगी साखर कारखान्यांनी यंदा गळीत हंगाम घेतला. नेहमीच ऊस उत्पादनासह साखर उताऱ्यात आघाडी असणारे हे जिल्हे यावेळी थोडे मागे पडले आहेत.

राज्यातील १०३ सहकारी व १०७ खासगी साखर कारखान्यांनी यंदा गळीत हंगाम घेतला. नेहमीच ऊस उत्पादनासह साखर उताऱ्यात आघाडी असणारे हे जिल्हे यावेळी थोडे मागे पडले आहेत.

कोल्हापूर : राज्यातील २१० खासगी व सहकारी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला असून, गेल्यावर्षीपेक्षा १ कोटी ९१ लाख २० हजार टनाने यंदा गाळप वाढले आहे.

तुलनेत साखर उताऱ्यात किंचतशी वाढ झाली असून, ऊस गाळपात मात्र यंदा सोलापूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.

सर्वाधिक १ कोटी ५९ लाख ९३ हजार ७१३ टन गाळप केले आहे. मात्र, साखर उतारा सरासरी ११.२८ टक्के राखत कोल्हापूर जिल्ह्याने साखर उत्पादनात मुसंडी मारली आहे.

राज्यातील १०३ सहकारी व १०७ खासगी साखर कारखान्यांनी यंदा गळीत हंगाम घेतला. नेहमीच ऊस उत्पादनासह साखर उताऱ्यात आघाडी असणारे कोल्हापूर व पुणे जिल्हे यावेळी थोडे मागे पडले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांनी १ कोटी २९ लाख ८७ हजार टनाचे गाळप करून १ कोटी ४६ लाख ४९ हजार ७१० क्विंटल साखर उत्पादित केली आहे.

या तुलनेत सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी १ कोटी ५९ लाख ९३ हजार ७१३ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.८५ टक्के उतारा राखत १ कोटी ४१ लाख ५९ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.

चांगल्या पावसाने सोलापूरचे क्षेत्र वाढले
गेल्यावर्षी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला. विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील खरीप पिकांना पोषक पाऊस राहिल्याने ऊस पीक जोमात आले होते. त्यामुळे उत्पादन वाढल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

प्रमुख जिल्ह्यातील ऊस गाळप व साखर उत्पादन

जिल्हाकारखाने संख्याऊस गाळप (टन)साखर उतारा (%)साखर उत्पादन (क्विंटल)
सोलापूर३७१ कोटी ५९ लाख८.८५१ कोटी ४१ लाख
कोल्हापूर२३१ कोटी २९ लाख११.२८१ कोटी ४६ लाख
पुणे१६१ कोटी १६ लाख९.८११ कोटी १४ लाख
आहिल्यानगर२२१ कोटी १५ लाख८.९३१ कोटी ०३ लाख
सातारा१७१ कोटी ०९ लाख९.९६१ कोटी ०८ लाख
सांगली१६८० लाख ५८ हजार१०.६०८५ लाख ४१ हजार
धाराशिव१५६२ लाख ११ हजार७.९७४९ लाख ४९ हजार
नाशिक०६९ लाख ५९ हजार१०.८६१० लाख ४१ हजार

अधिक वाचा: इतर झाडाच्या तुलनेत नारळाच्या झाडावरच का पडते वीज? जाणून घ्या ह्या मागचे लॉजिक

Web Title : गन्ना पेराई में सोलापुर अव्वल, चीनी उत्पादन में कोल्हापुर शीर्ष पर।

Web Summary : सोलापुर 1.59 करोड़ टन के साथ गन्ना पेराई में आगे रहा, जबकि कोल्हापुर 11.28% की चीनी रिकवरी दर के साथ चीनी उत्पादन में उत्कृष्ट रहा। कुल गन्ना पेराई में वृद्धि हुई, जिसमें 210 कारखानों ने भाग लिया। अच्छी बारिश ने सोलापुर की गन्ना उपज को बढ़ावा दिया।

Web Title : Solapur leads in sugarcane crushing, Kolhapur tops in sugar production.

Web Summary : Solapur led in sugarcane crushing with 1.59 crore tons, while Kolhapur excelled in sugar production with a 11.28% recovery rate. Overall sugarcane crushing increased, with 210 factories participating. Good rainfall boosted Solapur's sugarcane yield.