पुणे : लांबलेल्या पावसामुळे शेवग्याचे नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात शेवग्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.
मात्र, सोलापूर जिल्ह्यात झालेली अतिवृष्टीमुळे शेवगाचे प्रचंड नुकसान झाल्याने सध्या मार्केट यार्ड घाऊक बाजारात शेवग्याची आवक घटली आहे.
सोमवारी (दि. २४) ला केवळ आंध्र प्रदेशातून मार्केट यार्डातील घाऊक फळ भाजी बाजारात ४०० ते ५०० किलो शेवग्याची आवक झाली.
गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात दहा किलो शेवग्याला प्रतवारीनुसार १४०० ते १५०० रुपये असा भाव मिळाला होता. शेवगा प्रतिकिलो केवळ १५० रुपये मिळत होता. तो आता ५०० रुपयांवर पोहोचला आहे.
घाऊक बाजारात आवक अतिशय कमी झाल्याने शेवग्याला प्रतवारीनुसार ४०० ते ५०० रुपये किलो असा उच्चांकी भाव मिळाला आहे.
सध्या घाऊक बाजारात दहा किलो शेवग्याला तीन हजार रुपये किलो असा भाव मिळत आहे', असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते संघटनेचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी सांगितले.
लांबलेल्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेवग्याच्या हंगाम उशिराने सुरू होणार आहे. दक्षिणेकडील राज्यातील शेवग्याचा हंगाम अखेरच्या टप्यात आहे. मागणीच्या तुलनेत शेवग्याची आवक कमी झाल्याने भाववाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
पाच हजार नव्हे आता पाचशे किलोच शेवग्याची आवक
◼️ पुणे-मुंबईतील दाक्षिणात्य उपाहार गृहचालकांकडून शेवग्याला वर्षभर मोठी मागणी असते.
◼️ किरकोळ बाजारातही भाजी विक्रेत्यांकडून चांगली मागणी असते.
◼️ दररोज घाऊक बाजारातून उपहारगृह चालक शेवग्याची खरेदी करतात.
◼️ गेल्या आठवडाभरापासून शेवग्याची आवक कमी झाली आहे.
◼️ ऐरवी बाजारात दररोज चार ते पाच हजार किलो शेवग्याची आवक होते.
◼️ सध्या बाजारात केवळ चारशे ते पाचशे किलो शेवग्याची आवक होत आहे.
शेवगा उष्ण असल्याने मागणी; आरोग्यासाठी फायदेशीर
◼️ आरोग्यासाठी शेवगा खाल्याने अनेक फायदेशीर आहे. त्यामुळे अलीकडे शेवगा चा वापर वाढला.
◼️ मधुमेह व इतर आजारांवर शेवगा गुणकारी आहे.
◼️ शेवगा उष्ण असल्याने थंडीत गृहिणींकडून शेवग्याला मागणी अधिक असते.
◼️ मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने शेवग्याचे दर तेजीत आहेत.
अधिक वाचा: थंडीत मुळा का खावा? त्याचे शरीराला कसे होतात फायदे? जाणून घ्या सविस्तर
