Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > चीनच्या तब्बल २०० टन बेदाण्याची पुन्हा सांगलीत एन्ट्री; भारतीय बेदाण्याची भेसळ करून विक्री

चीनच्या तब्बल २०० टन बेदाण्याची पुन्हा सांगलीत एन्ट्री; भारतीय बेदाण्याची भेसळ करून विक्री

Nearly 200 tons of Chinese raisins re-enter Sangli; Indian raisins adulterated and sold | चीनच्या तब्बल २०० टन बेदाण्याची पुन्हा सांगलीत एन्ट्री; भारतीय बेदाण्याची भेसळ करून विक्री

चीनच्या तब्बल २०० टन बेदाण्याची पुन्हा सांगलीत एन्ट्री; भारतीय बेदाण्याची भेसळ करून विक्री

china bedana चीनच्या निकृष्ट दर्जाच्या बेदाण्याची आयात शुल्क वाचवून अफगाणिस्तान मार्गे भारतात प्रवेश झाला आहे. यापैकी २०० टन चीनचा निकृष्ट दर्जाचा बेदाणा सांगलीत आला आहे.

china bedana चीनच्या निकृष्ट दर्जाच्या बेदाण्याची आयात शुल्क वाचवून अफगाणिस्तान मार्गे भारतात प्रवेश झाला आहे. यापैकी २०० टन चीनचा निकृष्ट दर्जाचा बेदाणा सांगलीत आला आहे.

सांगली: चीनच्या निकृष्ट दर्जाच्या बेदाण्याची आयात शुल्क वाचवून अफगाणिस्तान मार्गे भारतात प्रवेश झाला आहे. यापैकी २०० टन चीनचा निकृष्ट दर्जाचा बेदाणा सांगलीत आला आहे.

आयात शुल्क बुडवून बेदाणा आणणाऱ्या व्यापाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघाचे पुणे विभागाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण यांनी केली आहे.

चीनच्या बेदाण्यामध्ये भारतीय बेदाण्याची भेसळ करून त्याची विक्री होत असल्याचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसत आहे, असेही चव्हाण म्हणाले.

मारुती चव्हाण यांनी जिल्हा पोलिस प्रमुख यांना निवेदन देऊन बेदाण्यातील भेसळीची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

मारुती चव्हाण म्हणाले, गेल्यावर्षी जिल्ह्यात बेदाण्याला चांगला दर मिळतोय म्हटल्यावर चीन येथील निकृष्ट दर्जाचा बेदाणा अफगाणिस्तान मार्गे भारतात आणला.

अन्न औषध प्रशासनाकडे कारवाई करण्याची मागणी करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच सध्या २०० टन निकृष्ट दर्जाचा चीन येथील बेदाणा आला आहे.

प्रशासनाच्या चुकीमुळे चीन येथील निकृष्ट दर्जाचा बेदाणा असाच येत राहिल्यास महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकरी संपणार आहे, अशा शब्दात जिल्ह्यातील उत्पादकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

निकृष्ट दर्जाचा बेदाणा आणणारे रॅकेट
◼️ अफगाणिस्तान ते गुजरात, महाराष्ट्र आणि सांगली जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांचे निकृष्ट दर्जाचे बेदाणा आणण्यामध्ये मोठे स्केट सक्रिय आहे.
◼️ बेदाणा आयात होण्यास आमचा विरोध नाही; पण व्यापाऱ्यांचे हे रॅकेट शासनाचा कर चुकवून चोरट्या मार्गाने बेदाणा भारतात आणून येथील द्राक्ष शेती संपुष्टात आणत आहे. या धोरणाला आमचा विरोध आहे.
◼️ चीनचा बेदाणा थेट भारतात आला त्यालाही आमचा विरोध नाही. कारण, चीन येथून भारतात बेदाणा आणायचे म्हटले तर १०५ टक्के आयात शुल्क आहे. या करामुळे तो बेदाणा भारतात येईपर्यंत प्रतिकिलो ४०० ते ५०० रुपये दर होत आहे.
◼️ पण आयात शुल्क चुकवून निकृष्ट दर्जाचा बेदाणा केवळ १८० ते २०० रुपयांमध्ये भारतामध्ये आला आहे. या बेदाण्याची भारतीय बेदाण्यात भेसळ करून विक्री होत आहे, यास आमचा विरोध आहे, असे मारुती चव्हाण म्हणाले.

तासगाव, मालगावच्या शीतगृहातही चीनचा बेदाणा
◼️ तासगाव आणि मालगाव (ता. मिरज) येथील शीतगृहांमध्ये चीनचा निकृष्ट दर्जाचा बेदाणा अफगाणिस्तानमार्गे आणून साठवण्यात आल्याचा गंभीर आरोप द्राक्ष बागायतदार संघाने केला आहे. या प्रकरणावर तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
◼️ द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण म्हणाले, तासगाव आणि मालगाव येथील शीतगृहांची तातडीने तपासणी करून संशयित बेदाणा जप्त करावा. निकृष्ट दर्जाचा माल बाजारात येणे म्हणजे शेतकऱ्यांसह ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ आहे.
◼️ अन्न व औषध प्रशासनाने कारवाई टाळली, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील शेतकरी बेमुदत ठिय्या आंदोलन करतील. शेतकऱ्यांच्या घामाच्या कष्टावर बाहेरील निकृष्ट मालाचा डल्ला आम्ही सहन करणार नाही.

भेसळ करून विक्री
यावेळी एक हजार ८०० टन बेदाणा सांगली जिल्ह्यात आणून त्याची भेसळ करून विक्री केली आहे. या गंभीर परिणामाकडे जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अशी त्यांनी मागणी केली.

अधिक वाचा: राज्यातील 'या' सहा मोठ्या धरणांतील गाळ काढण्यास मान्यता; शेतकऱ्यांना आता मोफत गाळ मिळणार

Web Title : चीनी किशमिश फिर सांगली में, भारतीय किशमिश के साथ मिलाकर बिक्री

Web Summary : आयात शुल्क से बचने के लिए अफगानिस्तान के रास्ते घटिया चीनी किशमिश सांगली में फिर से प्रवेश कर गई है। आरोप है कि इसे भारतीय किशमिश के साथ मिलाकर बेचा जा रहा है, जिससे स्थानीय किसानों को नुकसान हो रहा है। शामिल व्यापारियों के खिलाफ जांच और कार्रवाई की मांग की गई है। किसानों को बर्बादी का डर है।

Web Title : Chinese Raisins Re-enter Sangli, Mixed with Indian Raisins for Sale

Web Summary : 200 tons of substandard Chinese raisins have re-entered Sangli via Afghanistan to avoid import duties, alleges grape association. It is being mixed with Indian raisins, harming local farmers. An investigation and action against involved traders are demanded. Farmers fear ruin if this continues.