Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > अमेरिका-इराण युद्धामुळे भारतीय भाजीपाल्याची निर्यात ठप्प; तब्बल २००० कोटींची कृषी निर्यात संकटात

अमेरिका-इराण युद्धामुळे भारतीय भाजीपाल्याची निर्यात ठप्प; तब्बल २००० कोटींची कृषी निर्यात संकटात

Indian vegetable exports halted due to US-Iran war; Agricultural exports worth Rs 2000 crore in crisis | अमेरिका-इराण युद्धामुळे भारतीय भाजीपाल्याची निर्यात ठप्प; तब्बल २००० कोटींची कृषी निर्यात संकटात

अमेरिका-इराण युद्धामुळे भारतीय भाजीपाल्याची निर्यात ठप्प; तब्बल २००० कोटींची कृषी निर्यात संकटात

America Iran War Agri Export अमेरिका-इराण युद्धामुळे हवाई वाहतूक विस्कळीत झाली असल्याने भारतातून भाजीपाला व इतर कृषीमालाची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे.

America Iran War Agri Export अमेरिका-इराण युद्धामुळे हवाई वाहतूक विस्कळीत झाली असल्याने भारतातून भाजीपाला व इतर कृषीमालाची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे.

नामदेव मोरे
नवी मुंबई : अमेरिका-इराणयुद्धामुळे हवाई वाहतूक विस्कळीत झाली असल्याने भारतातून भाजीपाला व इतर कृषीमालाची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे.

ही स्थिती कायम राहिल्यास पुढील महिन्यात आंबा निर्यातीवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

भारतामधून आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळे, भाजीपाला व कृषी उत्पादनांची निर्यात केली जाते, तर त्या देशांतून खजूर व सुकामेवा भारतात आयात होतो.

गतवर्षी आखाती देशांबरोबर तब्बल २००८ कोटी रुपयांची निर्यात आणि ६६७० कोटी रुपयांची आयात झाली होती.

चालू आर्थिक वर्षातही निर्यात समाधानकारक होती; मात्र सध्याच्या युद्धजन्य स्थितीमुळे आयात-निर्यात व्यापारावर मोठा परिणाम दिसू लागला आहे.

सध्या हवाई मार्गे होणारी निर्यात पूर्णपणे बंद झाली आहे. समुद्री मार्गावरील व्यापार सुरू असला, तरी संघर्ष दीर्घकाळ चालल्यास त्यावरही परिणाम होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

खजूर आयातीला फटका
पुढील पंधरा दिवसांत खजूराची मोठी आयात अपेक्षित होती; परंतु युद्धामुळे या व्यापारालाही फटका बसू शकतो. सध्या रमजान महिना सुरू असल्याने मुस्लीम बांधवांच्या उपवासाला त्याची झळ पोहोचणार आहे.

युद्धग्रस्त देशांसोबत २०२४-२५ मधील निर्यात

क्रमांकदेशटनकोटी रुपये
यूएई८९,३९३१,३७९
इराण४५६३.७२
इराक३,५५८३६.२४
सौदी अरेबिया१३,९६५२६३
इस्त्रायल४,८३९७६.२५
जॉर्डन४२६१३.०७
कतार६,८५२१२३.१८
बहारीन१,९५६३७.९५
कुवेत४,००३७६.४३
 एकूण१,२५,४४८२,००८.८४

युद्धग्रस्त देशांसोबत २०२५-२६ मधील निर्यात

क्रमांकदेशटनकोटी रुपये
यूएई३,५१,०४२३,३९८
इराण२,९५,६०८२,२९७
इराक३,२३,४९२७०८
सोदी अरेबिया१५,०५२१३०.५७
इस्त्रायल३,१६४११९.६८
जॉर्डन३८६९.४५
कतार१४६२.४०
बहरीन१८४.३६
कुवेत१३३०.४३
 एकूण८,८९,०४४६,६७०

आखाती देशांमध्ये फळे व भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. युद्धामुळे हवाई मार्ग बंद झाल्याने निर्यात बंद थांबली आहे. - संजय पानसरे, संचालक, बाजार समिती

अधिक वाचा: यंदा कसा राहणार उन्हाळा? राज्यात कोणत्या भागात उष्णतेची तीव्रता अधिक असणार?

Web Title : अमेरिका-ईरान युद्ध से भारतीय सब्जी निर्यात बाधित; ₹2000 करोड़ का संकट

Web Summary : अमेरिका-ईरान युद्ध के कारण हवाई परिवहन बाधित होने से भारतीय सब्जी निर्यात रुक गया है। ₹2000 करोड़ का कृषि निर्यात संकट में है। खाड़ी देशों को फल और सब्जी निर्यात प्रभावित। रमजान के दौरान आम और खजूर का आयात भी प्रभावित।

Web Title : US-Iran Conflict Halts Indian Vegetable Exports; ₹2000 Crore Crisis Looms

Web Summary : The US-Iran conflict disrupted air transport, halting Indian vegetable exports. This ₹2000 crore agricultural export faces crisis. Fruit and vegetable exports to Gulf countries are affected. Disruption may extend to mango exports and Khajur imports, impacting Ramadan observances.