सोलापूर : येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी २३०० रुपये कमाल दर मिळाला. मंगळवारी बाजार समितीत एकूण १७२ कांद्याच्या गाड्यांची आवक झाली.
३४ हजार ५६४ पिशव्या, १७ हजार २८२ क्विंटल कांद्यातून १ कोटी ५५ लाख ४३ हजार ८०० रुपयांची उलाढाल झाल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले.
सध्या बाजारात पुणे, मराठवाडा, कर्नाटक व सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागातून कांदा बाजारात विक्रीसाठी येत आहे.
किमान दर १००, कमाल दर २३०० तर सर्वसाधारण दर ९०० असा दर प्रति क्विंटल कांद्याला मिळत आहे. आवक कमी झाल्यास भाव आणखीन वाढतील अशी आशा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
सध्या थंडीचे दिवस असल्याने कांद्याला चांगला भाव मिळत आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता लिलावास सुरुवात झाली.
सांगली, चंद्रपूर, नागपूर, नाशिक येथे कांद्याला सर्वाधिक दर मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या उन्हाळी कांद्याला भाव जास्त मिळत असल्याचे व्यापारी सांगतात.
अधिक वाचा: छत्रपती कारखान्याकडून ऊस दराचा नवा उच्चांक; पहिला हप्ता जाहीर, कसा दिला दर?
