Lokmat Agro >शेतशिवार > जत तालुक्यात पाणी संकट झालं गंभीर; डाळिंब बागा वाळायला सुरवात

जत तालुक्यात पाणी संकट झालं गंभीर; डाळिंब बागा वाळायला सुरवात

Water crisis becomes serious in Jat taluka; Pomegranate orchards start drying up | जत तालुक्यात पाणी संकट झालं गंभीर; डाळिंब बागा वाळायला सुरवात

जत तालुक्यात पाणी संकट झालं गंभीर; डाळिंब बागा वाळायला सुरवात

Jat Drought जत तालुक्यातील पाणी संकट गंभीर बनत चालले आहे. तलाव बंधारे, विहिरी, तलाव कोरडे पडले आहेत. कूपनलिका आटल्या आहेत.

Jat Drought जत तालुक्यातील पाणी संकट गंभीर बनत चालले आहे. तलाव बंधारे, विहिरी, तलाव कोरडे पडले आहेत. कूपनलिका आटल्या आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

जत तालुक्यातील पाणी संकट गंभीर बनत चालले आहे. तलाव बंधारे, विहिरी, तलाव कोरडे पडले आहेत. कूपनलिका आटल्या आहेत.

पाण्याअभावी डाळिंब बागातील झाडांची पाने झडून गेली असून फक्त फांद्या, खोडाचे सांगाडेच शिल्लक राहिले. शेतकरी बागा काढून टाकत आहेत.

पाणी मिळत नसल्याने बागा वाचविण्याचे शेतकऱ्यांसमोर आहे. हजार इतके जत डाळिंबाचे आव्हान होते. तालुक्यात ११ हजार ३४४.५९ हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र आहे.

शेततळी, कूपनलिका खोदून उजाड फोंड्या माळरानावर बागा फुलविल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यातच विहिरी, तलाव, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत.

सध्या १५ गावांना टॅकरने पाणीपुरवठा सुरू आहे. २१ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विस्तारित म्हैसाळचे योजनेतून पाणी सोडण्याचे केवळ आश्वासन दिले जात आहे.

तीन महिन्यांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी कमी पडल्याने पुढील हंगामातील डाळिंबाच्या उत्पादनाबाबत शंका असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.

तालुक्यात २०१२ ला दुष्काळ पडलेला होता. तेव्हा सरकारने डाळिंब बागा जगविण्यासाठी एकरी १० हजार रुपये पाण्यासाठी दिले होते. सध्या बागांना सरकारी मदतीची गरज आहे.

डाळिंब पीक विम्यात दुजाभाव
तालुक्यात २०२२-२३ सालचा डाळिंब फळबाग पीक विमा ट्रिगरच्या निकषानुसार नुकसान भरपाई देताना दुजाभाव झाला आहे. जत, शेगाव, डफळापूर, मुचंडी, कुंभारी, माडग्याळ, तिकोंडी या मंडलाला हेक्टरी ९२ हजार ५०० रुपये, तर उमदी, संख मंडलला केवळ ३२ हजार ५०० रुपये विमा मिळाला आहे.

डाळिंब बागांना चार महिन्यांपासून पाणी नाही. पाण्याअभावी बागा वाळल्याने शेतकरी बागा काढून टाकत आहेत. डाळिंब बागा जिवंत ठेवण्याची गरज आहे. सरकारने बागांना पाणी द्यावे. - लक्ष्मण कोळी, डाळिंब बागायतदार

अधिक वाचा: हवामान आधारीत फळपीक विमा योजनेतही बदल; आता या शेतकऱ्यांनाच मिळणार नुकसानभरपाई

Web Title: Water crisis becomes serious in Jat taluka; Pomegranate orchards start drying up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.