Join us

यंदा ऊस गाळप व साखर उताऱ्यात हा जिल्हा राज्यात नंबर एकवर; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 11:21 IST

Sugarcane Crushing 2024-25 मागील वर्षी पाऊस अल्प झाल्याचा फटका सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारीला मोठ्या प्रमाणावर बसला असून ऊस गाळपात जिल्हा तब्बल चौथ्या क्रमांकावर गेला आहे.

अरुण बारसकरसोलापूर : मागील वर्षी पाऊस अल्प झाल्याचा फटका सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारीला मोठ्या प्रमाणावर बसला असून ऊस गाळपात जिल्हा तब्बल चौथ्या क्रमांकावर गेला आहे.

साखर उताऱ्यात तर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यासह, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यांतील कारखान्यांनी सोलापूरला मागे टाकले आहे. साखर उताऱ्यात सोलापूर जिल्हा राज्यात ११ व्या क्रमांकावर गेला आहे.

राज्यात ऊस गाळप तर कमी झालेच शिवाय साखर उताराही कमी पडला आहे. त्याचा फटका राज्यभरातील साखर कारखानदारीला बसला आहेच शिवाय सोलापूर जिल्ह्याला सर्वाधिक बसल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडील आकडेवारीवरून दिसत आहे.

विशेष म्हणजे शेजारच्या धाराशिव जिल्ह्यापेक्षाही सोलापूर जिल्ह्यातील कारखाने साखर उताऱ्यात मागे आहेत. तीन-चार वर्षांनंतर एखाद्याच वर्षी सोलापूर जिल्ह्याचे ऊस गाळप राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असते अन्यथा राज्यात गाळपात सोलापूर जिल्हा नंबर १ असतो.

यंदा मात्र उलटे झाले आहे. सोलापूर जिल्हा ऊस गाळपात राज्यात चौथ्या क्रमांकावर गेला आहे. कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर नंतर सोलापूर जिल्ह्यातील ऊस गाळप झाले आहे. ऊस गाळप तर कमी झाले आहेच शिवाय साखर उताऱ्यालाही मोठा फटका बसला आहे.

ऊस गाळप किती?- कोल्हापूर जिल्ह्याचे ऊस गाळप एक कोटी २५ लाख १४ हजार मे. टन.- पुणे जिल्ह्याचे ऊस गाळप एक कोटी ८ लाख ३१ हजार मे.टन.- अहिल्यानगर जिल्ह्याचे गाळप एक कोटी दोन लाख ५९ हजार मे. टन.- सोलापूर जिल्ह्याचे ऊस गाळप एक कोटी दोन लाख ७ हजार मे. टन.साखर उतारा किती?- कोल्हापूर जिल्ह्याचा साखर उतारा सर्वाधिक ११.४ टक्के.- सांगली जिल्ह्याचा साखर उतारा १०.५७ टक्के.- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा उतारा १०.१६ टक्के.- नाशिक जिल्ह्याचा ९.९१ टक्के.- परभणी जिल्ह्याचा ९.८५ टक्के.- सातारा जिल्ह्याचा ९.७४ टक्के.- पुणे जिल्ह्याचा ९.४८ टक्के.- लातूरचा ९.४५ टक्के.- धाराशिव जिल्ह्याचा ८.८१ टक्के.- अहिल्यानगरचा ८.७७ टक्के.- सोलापूर जिल्ह्याचा साखर उतारा ८.४७ टक्के.

मागील वर्षी पाऊस नसल्याने ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटले. अनेक दिवस पाऊस राहिल्याने ऊसातून पाणी हटले नाही. पर्यायाने ऊस वाढीवर परिणाम झाला. जिल्ह्यात साखर कारखाने सुरू झाल्यानंतर मिळेल तो ऊस तोडावा लागला. पक्व नसलेल्या उसाची तोडणी झाल्याचा फटका साखर उताऱ्याला बसला. यामुळे साखर कारखान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. - महेश देशमुख, चेअरमन, लोकमंगल बीबीदारफळ

अधिक वाचा: जिद्दी शेतकरी राहुलने टँकरच्या पाण्यावर अर्ध्या एकरात विकली अडीच लाखांची कलिंगडे; वाचा सविस्तर

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीसोलापूरकोल्हापूरपुणेअहिल्यानगरमराठवाडामहाराष्ट्रपाऊस