Lokmat Agro >शेतशिवार > ‘उमेद’ मधील महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या 'या' १७ उत्पादनांना मिळणार जागतिक मार्केट

‘उमेद’ मधील महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या 'या' १७ उत्पादनांना मिळणार जागतिक मार्केट

These 17 products of women farmer producer companies under the 'Umed' campaign will get international markets | ‘उमेद’ मधील महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या 'या' १७ उत्पादनांना मिळणार जागतिक मार्केट

‘उमेद’ मधील महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या 'या' १७ उत्पादनांना मिळणार जागतिक मार्केट

मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे सुरू असलेल्या सियाल इंडिया २०२५ या देशातील सर्वात मोठ्या फूड एक्स्पोमध्ये महाराष्ट्र शासनाच्या ‘उमेद’ अभियानातील महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सादर केलेल्या उत्पादनांना विशेष दाद मिळाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे सुरू असलेल्या सियाल इंडिया २०२५ या देशातील सर्वात मोठ्या फूड एक्स्पोमध्ये महाराष्ट्र शासनाच्या ‘उमेद’ अभियानातील महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सादर केलेल्या उत्पादनांना विशेष दाद मिळाली आहे.

ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांमुळे ‘उमेद’ अभियानातील महिलांच्या सियाल इंडियामधील सहभागामुळे त्यांची उत्पादने या व्यासपीठामार्फत थेट जागतिक बाजारपेठेत पोहोचणार आहेत.

ग्रामीण महिलांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी ही सुवर्णसंधी ठरली आहे. या प्रदर्शनात १७ हून अधिक उत्पादने सादर करण्यात आली आहेत.

जागतिक पातळीवरील मान्यता
◼️ एक्स्पोचे उद्घाटन सियालचे महासंचालक निकोलस ट्रेंट्रेसॉक्स व एपीडा (APEDA) चे अध्यक्ष अभिषेक देव यांच्या हस्ते झाले.
◼️ ट्रेंट्रेसॉक्स यांनी उमेदच्या विविध स्टॉलला भेट देऊन उत्पादनांची गुणवत्ता तपासली व उमेदला गल्फ सियाल आणि दिल्ली सियालमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. तसेच अभिषेक देव यांनी उमेदची उत्पादने अपेडा (APEDA) पोर्टलवर उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले.
◼️ उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर व मुख्य परिचालन अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांनी ग्रामीण महिलांच्या कष्टाचे कौतुक करत हे यश महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ देईल, असा विश्वास व्यक्त केला.
◼️ सियाल इंडिया २०२५ मधील या यशामुळे ग्रामीण महिलांना जागतिक बाजारपेठेत प्रवेशाचे दार खुले झाले आहे.

महाराष्ट्र सदनात उमेदची उत्पादने
◼️ नुकतेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकारामुळे ‘उमेद’ अभियानातील महिलांच्या उत्पादनांना दिल्लीतील महाराष्ट्र सदनात कायमस्वरूपी दालन उपलब्ध झाले आहे.
◼️ त्यांची उत्पादने महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचे प्रतिनिधित्व करत आहेत. हे यश महिला सक्षमीकरण व ग्रामीण विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

‘उमेद’ अभियानाच्या उत्पादनांची मोठी रेंज
- माढा येथील डाळिंब, केळी, शेवगा.
- नाशिकचा प्रसिद्ध लाल कांदा.
- धाराशिवचे न्यूट्री शेवया.
- वायगावची भौगोलिक निर्देशांक (GI) प्राप्त हळद.
- देवगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील हापूस आंबा.
- साताराचे मिलेट कुकीज.
- सोलापूरची मालदांडी ज्वारी.
- प्रसिद्ध इंद्रायणी आणि चिनूर तांदूळ.
- चारू तूरडाळ.
- साताराचे घाण्यावरचे तेल (कोल्ड प्रेस ऑइल)
- बाजरी, नाचणी आणि मिरची यांसारखी इतर अनेक उत्पादने आहेत.

अधिक वाचा: काजू खावी तशी चव लागणारी देशी शेंग; लक्ष्मीवाडीच्या शेतकऱ्यांचा भुईमूग लागवडीचा हटके पॅटर्न

Web Title: These 17 products of women farmer producer companies under the 'Umed' campaign will get international markets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.