आपल्या शरीराचं तापमान जेव्हा ४२ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटीन अक्षरशः शिजू लागतं.
स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात. रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं, उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित राहावे
तसेच आपल्या शरीराचे तापमान ३७ अंशच कसे राहील याकडे लक्ष द्यावे, अन्यथा जिवाला धोका होऊ शकतो, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहेत.
उन्हाचा परिणाम आरोग्याही होत असून, अनेक शारीरिक व्याधीही डोके वर काढू लागले आहेत.
सूर्य पृथ्वीच्या मध्यावर, म्हणजेच विषुववृत्तावर येत असल्याने पृथ्वीवर त्याची सर्वाधिक ऊर्जा पोहोचत आहे.
उन्हामुळे मृत्यू का होतो?
◼️ कडक ऊन असल्याने, उष्माघाताचा झटका येण्याची शक्यता वाढते.
◼️ शिवाय शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने मृत्यू ओढावण्याचीही शक्यता आहे.
◼️ अतिनील किरणांचाही सर्वाधिक त्रास या काळात होण्याची शक्यता आहे.
◼️ त्यामुळे, पाणी जास्तीत जास्त पिण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
◼️ ज्यांना हृदयविकाराचा तसेच डायबेटीजचा त्रास आहे, त्यांनी व्यवस्थित चेक-अप करत राहावे.
काय काळजी घ्याल?
◼️ तहान नसल्यासही पुरेसे पाणी प्या.
◼️ सौम्य रंगाचे, सैल आणि कॉटनचे कपडे वापरा.
◼️ बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरा.
◼️ प्रवास करताना सोबत पाण्याची बॉटल घ्यायला विसरू नका.
◼️ आपलं घरं थंड ठेवा, पडदे लावा, सनशेड बसवा आणि शक्य असल्यास रात्री खिडक्या उघड्या ठेवा.
◼️ उन्हात डोक्यावर छत्री, टोपीचा वापर करा.
◼️ डोके, गळा, चेहऱ्यासाठी ओल्या कपड्याचा वापर करा.
◼️ अशक्तपणा, कमजोरपणा जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
◼️ ओआरएस, घरातील लस्सी, तोरणी, लिंबू पाणी किंवा ताक इत्यादी प्या.
◼️ थंड पाण्याने अंघोळ करा.
◼️ दुपारी १२ ते ३ दरम्यान उन्हात फिरू नका.
◼️ उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळं अन्न खाऊ नका.
अधिक वाचा: कडक उन्हाळ्यात मातीच्या माठात पाणी थंड होण्याचं नक्की लॉजिक काय? जाणून घ्या सविस्तर
