बदलत्या हवामानामुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊन उत्पादनात घट होते आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोक्यापासून संरक्षण मिळावे व नुकसान झाल्यास भरपाई मिळण्याकरिता कृषी विभागातर्फे पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता विमा पोर्टल सुरु झाले आहे. अवकाळी पाऊस कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट या धोक्यांपासून फळबागांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी फळपीक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे.
विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अॅग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणे आवश्यक आहे. ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल अॅप्लीकेशनमध्ये फळपिकाची नोंद करणे बंधनकारक आहे.
या योजनेचा हप्ता आपले सरकार सेवा केंद्र, बँक तसेच या www.pmfby.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावा. विमा अर्जासोबत फळबागेचा जीओ टॅगिंग केलेला फोटो विमा पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य आहे.
बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव पत्रक पूर्णतः भरून फळबागेची नोंद असलेला सातबारा उतारा, आधार कार्ड, स्वयंघोषणापत्र फळ बागेचा जिओ टॅगिंग केलेला फोटो व विमा हप्त्याची रक्कम याची आवश्यकता आहे.
खाते असलेल्या बँक शाखेत, वि.का.स. सेवा सोसायटीत अथवा सीएससी केंद्रात अंतिम मुदतीपूर्वी जमा करावी. विमा संरक्षण उत्पादनक्षम फळबागांना लागू राहील.
१० गुंठे ते ४ एकरांपर्यंत राहील क्षेत्र मर्यादा
योजनेत सहभागासाठी कोकण विभागाकरिता एक फळ पिकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र १० गुंठे व जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळून प्रति शेतकरी ४ हेक्टर इतकी राहील.
अधिक माहितीसाठी संपर्क
अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या सहायक कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा.
अधिक वाचा: Montha Cyclone : मोंथा चक्रीवादळ राज्यात कुठे धडकणार? पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट
