माळरानात, परसबागेत भूमिगत निपजणारी कंदमुळे सध्या बाजारात दाखल झाली आहेत. रताळी, आळव, करांदे अशा विविध प्रकारच्या कंदमुळांची आवक वाढली आहे.
आरोग्यवर्धक व सेंद्रिय खतापासून तयार झालेल्या या कंदमुळांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. प्रतिकिलो ५० ते ६० दराने विकल्या जात असलेल्या कंदमुळांच्या खरेदी करण्याकडेच मध्यमवर्गीयांची विशेष पसंती दिसून येत आहे
शहरातील रस्त्यांवर जागोजागी आदिवासी समाजातील महिला सध्या कंदमुळे विक्रीसाठी आणून ती ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत.
त्यामुळे आदिवासी महिलांची दिवाळीही गोड झाली आहे. येत्या कार्तिकी एकादशी, पंढरपूर यात्रेपर्यंत कंदमुळांची मागणी बाजारात वाढणार आहे.
आदिवासी वाड्यांवरचे माळरानावर, शेत शिवारातील बांधावर घराशेजारील परसबागांमधे कंदमुळाची लागवड केली जाते. तर रताळी, अळव यांचीही शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.
खर्च कमी, सेंद्रिय खते यांचा परिणामस्वरूप उत्पादन जास्त यामुळे बाजारात आदिवासी समाजाच्या महिला मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारातील कंदमुळे विक्रीसाठी घेऊन येतात.
हल्ली घरटी कापणीचा हंगाम सुरू झाल्याने उकड केलेली रताळी, अळव, कणव ही सर्रास नाश्ता करण्यासाठी खाल्ली जातात हे विशेष.
सध्या फास्ट फूड जमान्यात तेलकट तिखट, व गोड पदार्थ खाण्याची टाळाटाळ अनेक नागरिक करताना दिसतात. सकाळचा नाश्ता ही कंदमुळे उकडून खाण्याकडे नागरिकांच्या कल आहे.
आरोग्यदायी फलाहार
◼️ कणक, करांदे, रताळे, आळव, वेलीवरचे करांदे आणि जमिनीतला कंद, सुरण व इतर सर्व प्रकारात समाविष्ट असणारे कंद शरीराला भरपूर ऊर्जा देणारा आणि आरोग्यदायी फलाहार आहे.
◼️ थंडीत कफ वातनाशक असणारे कंदमुळे प्राचीन ऋषी-मुनीच्या आहार शास्त्राचा अविभाज्य भाग राहिलेले आहेत.
◼️ अलीकडे आरोग्यासाठी मस्त व स्वस्त असलेली कंदमुळाकडे दुर्लक्ष केल होते.
◼️ भूक भागविण्यासाठी झालेली धावपळ पहाता कंदमुळे खाण्याचा सल्ला उपयोगी ठरला आहे.
◼️ सकाळच्या वेळेत हे तेलविरहित पदार्थ खाल्ल्याने अपचन वा इतर विकार दूर होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
◼️ कंदमुळांमधील तंतुमय घटकांमुळे पचनक्रिया सुलभ होते.
◼️ रताळ्यात उच्च प्रमाणात व्हिटॅमिन ए, बी ५, बी ६, थायमिन, नायसिन, रिबोफलाविन व उच्च प्रमाणात कॅरोटेनॉइड्स असतात.
◼️ हे घटक कॅन्सर प्रतिबंधक असून दृष्टीही सतेज राहते.
◼️ तसेच रक्तवाहिन्या व धमन्यांमधील लवचिकता ठेवते.
◼️ कंदमुळांमध्ये हेल्दी फॅट्स आहेत. त्यामुळे हे नैसर्गिक पदार्थ अधिक आरोग्यदायी असतात.
अधिक वाचा: Zendu Ful : फुलशेतीत झेंडू ठरतोय ग्रामीण अर्थचक्राचं उर्जाफूल; जाणून घ्या सविस्तर