Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > इराणमधील युद्धामुळे करमाळ्यातील केळीला फटका; फेब्रुवारीमध्ये दरात सुधारणा होण्याची आशा

इराणमधील युद्धामुळे करमाळ्यातील केळीला फटका; फेब्रुवारीमध्ये दरात सुधारणा होण्याची आशा

Bananas in Karmala hit by war in Iran; Hope for price improvement in February | इराणमधील युद्धामुळे करमाळ्यातील केळीला फटका; फेब्रुवारीमध्ये दरात सुधारणा होण्याची आशा

इराणमधील युद्धामुळे करमाळ्यातील केळीला फटका; फेब्रुवारीमध्ये दरात सुधारणा होण्याची आशा

भारतातून आखाती देशातील इराणमध्ये ७० टक्के केळीची निर्यात होते. सध्या इराणमध्ये युद्धजन्य अस्थिर परस्थिती निर्माण झाल्यामुळे सध्या केळीची निर्यात थंडावल्याने दर पडले आहेत.

भारतातून आखाती देशातील इराणमध्ये ७० टक्के केळीची निर्यात होते. सध्या इराणमध्ये युद्धजन्य अस्थिर परस्थिती निर्माण झाल्यामुळे सध्या केळीची निर्यात थंडावल्याने दर पडले आहेत.

करमाळा : भारतातून आखाती देशातील इराणमध्ये ७० टक्के केळीची निर्यात होते. सध्या इराणमध्ये युद्धजन्य अस्थिर परस्थिती निर्माण झाल्यामुळे सध्या केळीची निर्यात थंडावल्याने दर पडले आहेत.

सोलापुरी केळीला इराण बाजारात वाढती मागणी असते. सध्या निर्यातक्षम दर्जेदार सोलापुरी केळीला १६ ते १७ रुपये दर मिळत आहे.

दर कमी असल्याने अनेक कंपन्यांनी केळ्यांच्या खरेदीपासून हात आखडता घेतला आहे. गतवर्षी याच केळीला ३० रुपये भाव मिळाला होता.

भाव पडल्याने निर्यातक्षम नवती केळी स्थानिक बाजारपेठेत विक्री करावी लागत आहे. परिणामी पुणे-मुंबई बाजारात मोठ्या प्रमाणात केळीचा माल पाठवावा लागत असून आवक वाढल्याने येथे ही दरात घसरण झाली आहे.

खोडवाला रद्दीपेक्षाही कमी दर
◼️ खोडवा केळीला रद्दीच्या भावापेक्षाही कमी दर मिळत असून, निर्यातक्षम केळी दरात मोठी घसरण झाली आहे.
◼️ सध्या खोडवा केळीचा दर ७ ते ८ रुपये किलो एवढाच आहे.
◼️ गतवर्षी २९ ते ३० रुपये किलो दराने विकली जाणारी निर्यातक्षम केळी आता १६ ते १७ रुपयाने विक्री होत आहे.

शेतकरी चिंताग्रस्त
◼️ इराणमधील खरेदीदारांच्या मते, ३१ जानेवारीनंतर दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे.
◼️ सोलापूर जिल्ह्यातील उजनी लाभक्षेत्र हे राज्यातील प्रमुख केळी उत्पादक क्षेत्र म्हणून ओळखले जाते.
◼️ या भागातील केळी उत्पादकांवर संकट कोसळले आहे.
◼️ लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

वादळी वारे, बिगरमोसमी पाऊस व कडाक्याच्या थंडीच्या संकटांना तोंड देऊन उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता दर घसरणीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र शहरांमध्ये डझनाला ४० ते ५० रुपये दराने केळी विकली जात असताना इकडे मात्र शेतकऱ्यांकडून व्यापारी वर्ग अत्यल्प दराने खरेदी करून व्यापारी शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत. - राजेंद्र मेरगळ, केळी उत्पादक, शेतकरी

अधिक वाचा: सौरपंप मिळण्यास होतोय उशीर! पुरवठादाराची निवड करताना शेतकऱ्यांचा उडतोय गोंधळ

Web Title : ईरान युद्ध का करमाला केले की कीमतों पर प्रभाव; फरवरी में सुधार की उम्मीद

Web Summary : ईरान में अस्थिरता से करमाला केले के निर्यात में गिरावट, कीमतें गिरीं। सोलापुरी केले की मांग घटी, किसानों को भारी नुकसान। कीमतें ₹30 से ₹16-17/kg तक गिर गईं। 31 जनवरी के बाद सुधार की उम्मीद, लेकिन कई किसानों को नुकसान।

Web Title : Iran War Impacts Karmala Banana Prices; February Hope for Improvement

Web Summary : Iran's instability hurts Karmala banana exports, dropping prices. Solapuri bananas face reduced demand, hitting farmers hard. Prices fell from ₹30 to ₹16-17/kg. Improvement expected after January 31st, but many farmers face losses.