कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्याआधी गणरायाला वंदन केलं जातं. सध्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. पण तुम्हाला माहित आहे का? गणरायाच्या पूजेसाठी काही गोष्टींचं विशेष महत्त्व असतं. यावेळी 2 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. आज आम्ही तुम्हाला अशा 5 वस्तूंबाबत सांगणार आहोत ज्यांचा गणेश पूजनामध्ये समावेश करणं अत्यंत आवश्यक असतं. 

मोदक 

गणरायाला लंबोदर असंही म्हटलं जातं. गणरायाच्या नैवेद्यामध्ये गोड पदार्थांचा समावेश करणं अत्यंत फायदेशीर असतं. गणपतीला मोदक फार आवडतात. त्यामुळे नैवेद्य म्हणून मोदक असणं अत्यंत आवश्यक असतं. 

दुर्वा

विघ्नहर्त्याला दुर्वा फुलांपेक्षाही जास्त आवडतात. त्यामुळे पुजे दरम्यान दुर्वा तोडून देवाला अर्पण कराव्यात. 

झेंडूची फुलं 

फुलांमध्ये गजाननाला सर्वाधिक झेंडुची फुलं आवडतात. त्यामुळे बाप्पाला झेडूंची फुलं वाहण्यास विसरू नका. शक्य असल्यास तुम्ही झेंडुच्या फुलांची आरासही करू शकता. 

केळी

बाप्पाला फळांमध्ये सर्वाधिक केळी आवडतात. त्यामुळे बाप्पाला केळ्यांचा नैवेद्य दाखवा. पण लक्षात ठेवा. शास्त्रामध्ये सांगितल्यानुसार, केळ्याचं एक फळं पूर्ण मानलं नाही जात. त्यामुळे नेहमी दोन केळी देवाला अर्पण करावीत. 

शंख

गणपतीच्या चार हातांपैकी एका हातामध्ये त्यांनी शंख धारण केला आहे. त्यामुळे शास्त्रात सांगितल्यानुसार, गणरायाच्या पूजेमध्ये शंख फुंकणं आवश्यक ठरतं.  गणारायाच्या आरतीच्या वेळी शंख फुंकण्यास विसरू नका. 

Web Title: Ganesh chaturthi 2019 these 5 things is necessary in lord ganesha worship

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.