Maharashtra Election Voting Live : रिसोड विधानसभा मतदारसंघात दुपारपर्यंत ३५.७६ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 03:35 PM2019-04-18T15:35:32+5:302019-04-18T15:36:07+5:30

निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांसह ईतर ११ उमेदवार रिंगणात असून दुपारी १ वाजेपर्यंत ३५.७६ टक्के मतदान झाले.

Polling for 35.76 percent till noon in Risod | Maharashtra Election Voting Live : रिसोड विधानसभा मतदारसंघात दुपारपर्यंत ३५.७६ टक्के मतदान

Maharashtra Election Voting Live : रिसोड विधानसभा मतदारसंघात दुपारपर्यंत ३५.७६ टक्के मतदान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड  :   अकोला लोकसभेच्या निवडणुकीसाठी दुसºया टप्प्यातील गुरुवार  १८ एप्रिल रोजी मतदान रिसोड विधानसभा मतदारसंघात शांततेत पार पडले. या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांसह ईतर ११ उमेदवार रिंगणात असून दुपारी १ वाजेपर्यंत ३५.७६ टक्के मतदान झाले.
अकोला लोकसभा मतदारसंघात असलेल्या रिसोड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात येणाºया मतदान केंद्रावर  सकाळी ९ वाजेपर्यंत  २७२४० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये २०४४८ पुरुष व ६७९२ महिलांचा समावेश आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी ८.९६ इतकी होती. ११ वाजेपर्यंत ६६४२६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून २१.८४ टक्के मतदान करण्यात आले होते. यामध्ये ४३१०९ पुरुष व २३३१७ महिलांचा सहभाग होता. सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत एकूण ६६४२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दुपारी १ वाजेपर्यंत ३५.७६ टक्के मतदान झाले. 
रिसोड मालेगाव विधान सभा क्षेत्रातील एकूण ३३४ मतदान केंद्रावर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ४२ संवेदनशील व ३२ अतिसंवेदनशील केंद्र असून या केंद्रावर प्रशासनाची करडी नजर आहे. दुपारपर्यंत कुठेही अनुचित प्रकार घडल्याची घटना घडली  नाही.  रिसोड विधानसभा मतदारसंघात  एकूण तीन लाख चार हजार एकशे सत्तावीस मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार एक लाख ६० हजार १३५ तर महिला मतदार एक लाख ४३ हजार नऊशे ८६ मतदार असून यापैकी दुपारी १ वाजेपर्यंत ३५.७६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

Web Title: Polling for 35.76 percent till noon in Risod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.