पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आदित्यनाथ योगींची सभा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 02:10 AM2019-04-18T02:10:10+5:302019-04-18T02:10:49+5:30

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहिर सभा विरार येथे घेण्यात आली होती.

Palghar Lok Sabha by-election for the Adityanath Yogi | पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आदित्यनाथ योगींची सभा

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आदित्यनाथ योगींची सभा

Next

वसई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहिर सभा विरार येथे घेण्यात आली होती. भाजपाकडून उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी आलेले योगी यावेळी पुन्हा महायुतीचे गावित यांना मत द्या म्हणून मतदारांपुढे मतांचा जोगवा मागणार आहेत. योगींची जाहिर सभा येत्या २२ एप्रिलला नालासोपारा सेंट्रल पार्क येथे घेण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणूकीच्या पाशर््वभूमीवर सेना-भाजपा युती झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा वसईत प्रचारासाठी येत आहेत. त्यांच्या जाहिर सभेत कोणतीही उणीव असता कामा नये म्हणून पदाधिकारी व कार्यकर्ते जोरात कामाला लागले आहेत. या अगोदर योगी १९ एप्रिलला येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता त्यात बदल केला गेला असल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांनी दिली. पालघर लोकसभा निवडणूक प्रचारासाठी अवघ्या दहा दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपा-शिवसेनेचे अनेक मोठे नेते वसई-विरारसह पालघर जिल्ह्यात प्रचारासाठी येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. योगी आदित्यनाथ यांच्या जाहिर सभेकडे सध्या वसई-विरारच्या मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.
गेल्या लोकसभा पोटनिवडणूकीच्या वेळी शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांची सभा वसईतील वसंत नगरी मैदानावर ज्या दिवशी होती त्याच दिवशी विरार मनवेलपाडा येथे योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजीत करण्यात आली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याच्या दोन दिवस अगोदर नालासोपाऱ्यात गालानगरमध्ये भोजपूरी अभिनेता मनोज तिवारी याला सोबत घेऊन उत्तर भारतीय मतदारांना भाजपाला मतदान करण्यासाठी आवाहन केले होते. या तिन्ही नेत्यांच्या सभा वसई, नालासोपारा व विरार येथे झाल्यानंतरही त्यावेळचा तिस-या स्थानाचा दावेदार पक्ष बहुजन विकास आघाडी पक्षाला फारसा मताधिक्यात फरक पडला नव्हता. मात्र आता स्थिती वेगळी आहे.
गेल्या पोटनिवडणुकीत योगींचे तिखट भाषण तर उद्धवांचे प्रत्युत्तर
पालघर लोकसभा पोटनिवडणूकिच्या काळात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनाविरोधी तिखट भाषण केले होते.शिवसेनेने भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप त्यांनी करून,शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा पक्ष राहिला नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. आजची शिवसेनाही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नसल्याचा टोलाही त्यांनी लावला होता. अफजल खानबरोबर शिवसेनेची तुलना करायला ते विसरले नव्हते.त्याचवेळी वसईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची देखील सभा सुरू होती. योगी आदित्यनाथ यांनी पायात चप्पल घालून छत्रपती शिवरायांना वंदन केल्याबद्दल त्यांनी जाहिर नाराजी व्यक्त केली होती.महाराष्ट्रात येऊन योगींना विकासाचा उपदेशाचा डोस देण्याची गरज नसून,गोरखपूर येथील रूग्णालयात मृत्यू पावलेल्या बालकांबद्दल ते काही करू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी सडकून टीका केली होती.फक्त निवडणूक काळात ते भारतात राहात असल्याचा टोला त्यांनी लावला होता.

Web Title: Palghar Lok Sabha by-election for the Adityanath Yogi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.