‘मतदानाच्या दिवशी कामावर हजर राहा’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 11:33 PM2019-04-27T23:33:32+5:302019-04-27T23:33:57+5:30

वैद्यकीय अधीक्षकांचा अजब आदेश, वसई-विरार शहर महानगरपालिकेतील प्रकार

Appear on the day of voting. | ‘मतदानाच्या दिवशी कामावर हजर राहा’

‘मतदानाच्या दिवशी कामावर हजर राहा’

Next

नालासोपारा : संपुर्ण देशभरात लोकसभेची निवडणूक असल्यामुळे ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी मतदारांना सुट्टी द्यावी जेणेकरून मतदानाचा टक्का घसरू नये म्हणून निवडणूक आयोग कोट्यवधी रुपये खर्च करून वर्तमानपत्रात, टीव्हीवर जाहिरात पदर्शित केली जाते पण याला अपवाद वसई विरार शहर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग आहे.

२९ एप्रिलला पालघर लोकसभेसाठी मतदान होणार आहे पण या दिवशी माता बाल संगोपन केंद्राचे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे, वसई विरार मनपाचे रु ग्णालयाचे, मनपाच्या दवाखानाचे विविध विभागातून येणारे १०० च्या वर असलेले वैद्यकीय अधिकारी आणि २०० ते २५० कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारची रजा देण्यात येऊ नये तसेच कोणीही परस्पर गैरहजर राहणार नाही असा अजब फतवा मनपाचे प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. तबसुम काझी यांच्या नावाने २२ एिप्रलला अजब फतवा काढल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महत्वाचे म्हणजे ज्यांच्या नावाने हा फतवा काढला आहे त्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी काझी यांचे स्वत: चे लग्न असल्याने ५ ते ६ दिवसांपासून गैरहजर असून ८ मे पर्यंत सुट्टीवर असल्याचेही कळते. नाव न सांगण्याच्या अटीवर एका वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले की, मतदान करा आणि मतदानाचा टक्का घसरू नये म्हणून सर्वत्र सुट्या जाहीर केल्या आहे पण आम्हाला मतदानासाठी का सुट्टी नाही, कर्मचाऱ्यांना का सुट्टी नाही, स्वत: सुट्टीवर गेल्या आहेत हा कोणता न्याय आहे.

मी बघतो, पाहतो अन बोलतो
मला या बाबतीत माहीत नसून कधी हा व कोणी आदेश काढला. जरी आदेश काढला असेल तरी त्यांना मतदानासाठी सूट दिली असेल. मी बघतो कोणी व काय आदेश काढला ते अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांच्याशी बोलतो.
- बळीराम पवार
(आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका)

Web Title: Appear on the day of voting.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.