झी चित्र गौरवने प्रभाकर जोग यांना 'जीवन गौरव' देऊन केले सन्मानित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 01:18 PM2019-03-25T13:18:34+5:302019-03-25T13:21:02+5:30

संगीतावर प्रेम करणाऱ्या तमाम रसिकांच्या वतीने प्रभाकर जोग यांना यंदाचा झी चित्र गौरव २०१९चा  जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

Zee chitra gaurav honoured Prabhakar Jog by jivan gaurav award | झी चित्र गौरवने प्रभाकर जोग यांना 'जीवन गौरव' देऊन केले सन्मानित

झी चित्र गौरवने प्रभाकर जोग यांना 'जीवन गौरव' देऊन केले सन्मानित

googlenewsNext
ठळक मुद्देअडचणींचा सामना करत त्यांच्या या प्रवासात प्रभाकरजींनी संगीतसाधनेत मात्र खंड पडू दिला नाही

मराठी चित्रपट सृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित झी चित्र गौरव २०१९चा पुरस्कार सोहळा दिमाखदार पद्धतीत पार पडला. यंदा झी गौरव पुरस्कार हे २० व्या वर्षात पदार्पण करत आहेत.  गेल्या वीस वर्षात या पुरस्कार सोहळ्याने अनेक कलाकार, तंत्रज्ञ् यांना सन्मानित केले आहे. याहीवर्षी अशाच एका जेष्ठ कलाकाराला जीवन गौरव देऊन सन्मानित करण्यात आले.

मुळातच व्हायोलिन हे वाद्य म्हणजे तरल, हळवे सूर. या वाद्याचा गोडवा आणि हळवेपणा तंतोतंत यांच्या व्यक्तिमत्वात उतरलं असल्याची जाणीव होते आणि हे गाणारं व्हायोलिन म्हणजे प्रभाकर जोग असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

नगरमधल्या हरेगाव जिल्ह्यात १६ जणांच्या कुटुंबात आपला जन्म झालेल्या प्रभाकरजींच्या वडिलांना असलेली संगीत नाटकांची विशेष आवड कदाचित त्यांच्यात झिरपली असावी. पं. गजाननबुवांकडे त्यांनी संगीताचा श्रीगणेशा केला आणि नंतर नारायणबुवा मारुलकरांकडे आपले शिक्षण सुरु राहिले. यादरम्यान व्हायोलिन सतत त्यांना खुणावत राहिले. त्या काळात तब्बल २५० रुपयांचे लहानसे व्हायोलिन प्रभाकरजींना मिळाले. तिथून या वाद्यासोबत जी गट्टी जमली ती अगदी आजवर. अनेक अडचणींचा सामना करत त्यांच्या या प्रवासात प्रभाकरजींनी संगीतसाधनेत मात्र खंड पडू दिला नाही. संगीत क्षेत्रात व्हायोलिन म्हणजे जोग हेच समीकरण बनलं. संगीतावर प्रेम करणाऱ्या तमाम रसिकांच्या वतीने प्रभाकर जोग यांना यंदाचा झी चित्र गौरव २०१९चा  जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

Web Title: Zee chitra gaurav honoured Prabhakar Jog by jivan gaurav award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.