'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील कार्तिक - नायराजवळ रसिकांनी व्यक्त केली ही इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 05:07 PM2018-11-05T17:07:08+5:302018-11-05T17:14:38+5:30

दोघांच्या प्रेमाच्या गोष्टी चांगल्याच रंगल्या असताना याच मालिकेतील आणखी एक जोडीची प्रेमाच्या नात्यात बुडाल्याचं बोललं जात आहे.

Ye Rishta Kya Kehlata Hai Actor kartik and nayara fans wants them together | 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील कार्तिक - नायराजवळ रसिकांनी व्यक्त केली ही इच्छा

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील कार्तिक - नायराजवळ रसिकांनी व्यक्त केली ही इच्छा

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील सुपरहिट मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील  नायरा आणि कार्तिक ही जोडी सा-यांची फेव्हरेट जोडी ठरत आहे. अक्षराची लेक नायरा आणि कार्तिक मालिकेतील प्रमुख व्यक्तीरेखा असून नायरा आणि कार्तिक यांनीच सा-यांना आजही मालिकेशी खिळवून ठेवले आहे. या दोघांची जोडी इतकी पसंतीस पात्र ठरते की, या दोघांनी खरंच लग्नबंधनात अडकावे अशी इच्छा व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. नायराची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवांगी जोशी आणि कार्तिकची भूमिका साकारणारा मोहसिन खान यांच्यात सध्या रियल लाइफ लव्ह स्टोरी रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे. दोघांच्या प्रेमाच्या गोष्टी चांगल्याच रंगल्या असताना याच मालिकेतील आणखी एक जोडीची प्रेमाच्या नात्यात बुडाल्याचं बोललं जात आहे. 'ये रिश्ता क्या केहलाता है' या मालिकेत नक्ष ही भूमिका साकारणारा अभिनेता रिषी देव आणि मोहेना सिंग यांच्यात प्रेमाचं नातं जडू लागलं आहे. दोघंही एकमेकांना पसंत करत असून बराच काळ एकत्र घालवत आहेत. दोघांमधील हे प्रेमाचं नातं दिवसेंदिवस आणखी घट्ट बनत चाललं आहे.  

नुकतेच 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील कार्तिकचा एक डान्सिंग व्हिडीओ समोर आला आहे.यांत तो झिंगाट गाण्यावर ठेका धरताना पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे नुकताच कार्तिक म्हणजे मोहसिन खानचा वाढदिवस होता. वाढदिवस त्याने त्याच्या कुटुंबियाबरोबर सेलिब्रेट केला. यावेळी त्याचे कुटुंबियही मोहसीन बरोबर 'झिंगाट' गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहेत.

मोहसीन सोशल  मीडियावर खूप अॅक्टीव्ह असतो. त्याचे असे भन्नाट व्हीडीओ, स्टायलिश फोटोशूट तो त्याच्या चाहत्यांसह शेअर करत असतो. त्यामुळेच त्याच्या चाहत्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे.  सशल मीडियावर मोहसीनचे जवळपास 10 लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Web Title: Ye Rishta Kya Kehlata Hai Actor kartik and nayara fans wants them together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.