'तुझ्यात जीव रंगला'मधील वहिनीसाहेब थिरकल्या 'दिलबर'वर, व्हिडिओतील अदा पाहून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 01:46 PM2019-06-18T13:46:02+5:302019-06-18T13:46:31+5:30

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत पाठकबाईंना धडा शिकवण्यासाठी सतत डोकं लावत असणारी नंदिता वहिनी म्हणजे अभिनेत्री धनश्री काडगांवकरला या मालिकेमुळे चांगली लोकप्रियता मिळाल्याचे पाहायाला मिळतंय.

Tuzyat Jeev Rangala Fame Vahinisaheb Aka Dhanashri Kadgaonkar dancing on Dilbar Song, Watch her Dance Video | 'तुझ्यात जीव रंगला'मधील वहिनीसाहेब थिरकल्या 'दिलबर'वर, व्हिडिओतील अदा पाहून व्हाल थक्क!

'तुझ्यात जीव रंगला'मधील वहिनीसाहेब थिरकल्या 'दिलबर'वर, व्हिडिओतील अदा पाहून व्हाल थक्क!

googlenewsNext

झी मराठी वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत पाठकबाईंना धडा शिकवण्यासाठी सतत डोकं लावत असणारी नंदिता वहिनी म्हणजे अभिनेत्री धनश्री काडगांवकरला या मालिकेमुळे चांगली लोकप्रियता मिळाल्याचे पाहायाला मिळतंय. मालिकेत तिच्या अभिनयासह तिच्या सौदर्यांनेही रसिकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील राणादा आणि पाठकबाईंची जोडी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य तर करतेच आहे पण त्यापाठोपाठ धनश्रीही म्हणजेच नंदिता वहिनीदेखील साऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली. 


धनश्री काडगांवकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिच्या चाहत्यांना तिचे अपडेट देत असते. नुकताच तिने एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात ती दिलबर दिलबर गाण्यावर थिरकताना दिसतेय. ती या गाण्यावर खूप छान डान्स करत असून तिचा डान्स पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल.


धनश्रीनं तिच्या डान्सचा व्हिडिओ शेअर करून म्हटलं की, मला नेहमीच अभिनयाएवढचे डान्सचे वेड आहे. सराव करून परफेक्ट डान्स येतो. ही तर फक्त सुरूवात आहे.


काही दिवसांपूर्वी धनश्री ईशान्य भारतात सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिने या ठिकाणचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तिने इंस्टाग्रामवर अरूणाचल प्रदेश व मेघालय येथील फोटोंसोबत मेघालयातील निसर्गाचा सुंदर फोटो शेअर करीत बालपणीच्या आठवणींना उजाळादेखील दिला होता. या व्हॅकेशनमधील फोटोत ती खूप सुंदर व ग्लॅमरस दिसत होती.


धनश्री सध्या फिटनेस फ्रीक झाल्याचेदेखील सोशल मीडियावर पहायला मिळतेय.

तिने सोशल मीडियावर तिचे जीममध्ये व्यायाम करतानाचे फोटो शेअर केले आहेत. 

Web Title: Tuzyat Jeev Rangala Fame Vahinisaheb Aka Dhanashri Kadgaonkar dancing on Dilbar Song, Watch her Dance Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.