Tiger Shroff to be a special judge on Nach Baliye? | टायगर श्रॉफ या कार्यक्रमाद्वारे करणार छोट्या पडद्यावर एंट्री ?
टायगर श्रॉफ या कार्यक्रमाद्वारे करणार छोट्या पडद्यावर एंट्री ?

ठळक मुद्देनच बलिये या कार्यक्रमात टायगर विशेष परीक्षक या नात्याने सहभागी होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमात विशेष परीक्षकाची भूमिका स्वीकारण्याबद्दल त्याच्याकडे विचारणा करण्यात आली असून तोसुद्धा यावर सकारात्मक विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘स्टार प्लस’वरील सर्वात लोकप्रिय रिअ‍ॅलिटी कार्यक्रम ‘नच बलिये’ लवकरच टीव्हीच्या पडद्यावर पुन्हा झळकणार असून या कार्यक्रमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या कार्यक्रमाच्या प्रत्येक सिझनला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या कार्यक्रमात नेहमीच बॉलिवूड, टिव्ही आणि मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोड्या आपल्या नृत्याने प्रेक्षकांना प्रभावित करतात. या सिझनमध्ये देखील अनेक प्रसिद्ध जोड्या सहभागी होणार आहेत. प्रेक्षकांच्या आवडत्या जोड्या आठवड्यांमागून आठवडे वेगवेगळे प्रकारची नृत्ये सादर करताना पाहून प्रेक्षकांचे भान हरपणार यात काहीच शंका नाही. 

‘नच बलिये’ या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून आता कोणते सेलिब्रेटी या कार्यक्रमाचा भाग असणार, तसेच कोण या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार, या कार्यक्रमाचा परीक्षक कोण असणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. 

बॉलिवूडचा आजचा आघाडीचा अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या अभिनयाप्रमाणे त्याच्या नृत्यासाठी देखील ओळखला जातो. त्याच्या नृत्याचे अनेक फॅन्स आहेत. नच बलिये या कार्यक्रमात टायगर विशेष परीक्षक या नात्याने सहभागी होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमात विशेष परीक्षकाची भूमिका स्वीकारण्याबद्दल त्याच्याकडे विचारणा करण्यात आली असून तोसुद्धा यावर सकारात्मक विचार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. टायगर खरोखरच या कार्यक्रमात सहभागी झाला, तर त्याच्यासारख्या एका निष्णात नर्तकाबरोबर कोणाला नृत्य करायला आवडणार नाही? अगदी या कार्यक्रमातील सेलिब्रिटी जोड्यांनाही टायगरबरोबर नृत्य करायला आणि त्याच्याकडून आपल्या नृत्याला अधिक सफाईदार करण्याचा सल्ला घेण्यास ते उत्सुक असतील.
 
मोठ्या पडद्यावर रसिकांच्या काळजात अढळ स्थान प्राप्त केल्यानंतर शाहिद कपूर आता छोट्या पडद्यावर एंट्री करणार असल्याची देखील चर्चा चांगलीच रंगली होती. डान्सिंग रिअॅलिटी शो ‘नच बलिए ९’ सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे या सीजनला शाहिद कपूर एकटाच जज करणार नाही तर त्याला त्याची पत्नी मीरा राजपूत देखील साथ देणार असल्याचे म्हटले जात आहे. नच बलिये या कार्यक्रमात शाहिद कपूर, मीरा रजपूत, टायगर श्रॉफ यांच्यामध्ये कोण परीक्षकाची भूमिका बजावणार हे प्रेक्षकांना हा कार्यक्रम सुरू झाल्यावरच कळेल. 


Web Title: Tiger Shroff to be a special judge on Nach Baliye?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.