म्हणून सुव्रत जोशी झाला भावूक, आठवली त्याला बा.सी.मर्ढेकरांची कविता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 03:52 PM2018-12-29T15:52:41+5:302018-12-29T15:54:12+5:30

मुंबईचे बदललेले वातावरण हे सुव्रतच्या बदललेल्या मूडला कारणीभूत असल्याचे त्याच्या पोस्टमधून समोर आले आहे.

Suvrat Joshi Got Emotional,Reminded Him B.s. Mardhekar’s poem | म्हणून सुव्रत जोशी झाला भावूक, आठवली त्याला बा.सी.मर्ढेकरांची कविता

म्हणून सुव्रत जोशी झाला भावूक, आठवली त्याला बा.सी.मर्ढेकरांची कविता

googlenewsNext

'दिल दोस्ती दुनियादारी' या छोट्या पडद्यावरील मालिकेतून सुव्रत जोशी घराघरातील रसिकांचा लाडका अभिनेता बनला. मालिकांसह तो काही रियालिटी शोचं सूत्रसंचालन करतानाही दिसला. याशिवाय रंगभूमी आणि सिनेमातही त्याने आपल्या अभिनयाची जादू दाखवली. सध्या सुव्रतची भूमिका असलेले अमर फोटो स्टुडिओ हे नाटक रंगभूमीवर गाजत आहे. यातील त्याची भूमिकाही नाट्यरसिकांना भावते आहे. लवकरच त्याचे नवं नाटक रंगभूमीवर येत असून त्याच्या या आगामी नाटकाचे नाव शाही पहारेदार असं आहे.

सुव्रत खोड्या काढणारा आणि मजा मस्ती करणारा असा व्यक्ती आहे. ही बाब त्याचे सहकलाकार आणि मित्र अमेय वाघ तसंच सखी गोखलेसुद्धा मान्य करतील. मात्र काही दिवसांपूर्वी सुव्रत अचानक भावुक झाला. मुंबईचे बदललेले वातावरण हे सुव्रतच्या बदललेल्या मूडला कारणीभूत असल्याचे त्याच्या पोस्टमधून समोर आले आहे. या संदर्भातील एक पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. “मुंबईचे वातावरण इतकं थंड असू शकतं हे कधीच वाटलं नव्हतं. मुंबईत फक्त तीन प्रकारचं वातावरण अनुभवायला मिळतं, एक म्हणजे अति उष्ण, उष्ण आणि पावसाळी. मात्र आपला हा समज म्हणजे एक भ्रम असल्याचे जाणवलं ज्यावेळी मुंबईत गारेगार असं वातावरण अनुभवलं” असं या पोस्टमध्ये सुव्रतने नमूद केले आहे. शिवाय या वातावरणामुळे प्रसिद्ध कवी बा. सी. मर्ढेकर यांची जुनी कविता आठवल्याचेही सुव्रतने यांत नमूद केले आहे. निसर्गाकडून असे अनेक आश्चर्य अनुभवायला मिळतात असेही त्याने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
 

Web Title: Suvrat Joshi Got Emotional,Reminded Him B.s. Mardhekar’s poem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.