स्टार प्रवाह वाहिनीने केली दशकपूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 07:34 PM2018-11-22T19:34:33+5:302018-11-22T19:35:10+5:30

स्टार प्रवाह वाहिनी उदयास आली आणि बघता बघता १० वर्ष झाली.

Star Pravah Channel completed 10 years | स्टार प्रवाह वाहिनीने केली दशकपूर्ती

स्टार प्रवाह वाहिनीने केली दशकपूर्ती

googlenewsNext


प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देण्याच्या हेतूने स्टार प्रवाह वाहिनी उदयास आली आणि बघता बघता १० वर्ष झाली. या दहा वर्षात प्रत्येकाला आपलीशी वाटेल अशी गोष्ट आणि घरातल्या कुटुंबाचा सदस्य वाटणारी पात्र स्टार प्रवाह या वाहिनीने दिली. त्या पात्रांवर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केले आणि त्यामुळेच दहा वर्षांचा हा टप्पा गाठणे शक्य झाले. 
नवनवे प्रयोग करण्याचे बळ मिळाल्यामुळेच ‘विठुमाऊली’ सारखी पौराणिक मालिका करण्याचे शिवधनुष्य स्टार प्रवाहने उचलले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठुरायाची गोष्ट मालिकेच्या रुपात पहिल्यांदाच उलगडली आणि घरबसल्या लाडक्या विठ्ठलाचं प्रेक्षकांना दर्शन होऊ लागलं. 
स्टार प्रवाहवरील मालिकांमधून स्त्रीची हीच वेगवेगळी रुपं पाहायला मिळतात. ‘कर्ता पुरुष नाही, तर कर्ती स्त्री’ असे ठणकावून सांगणारी ‘छत्रीवाली’ मालिकेतील मधुरा प्रत्येकालाच प्रेरित करते. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी खांद्यावर घेणारी मधुरा परिस्थीतीपुढे मात्र कधीच झुकत नाही. समोर येणारं प्रत्येक आव्हान स्वीकारुन ती स्वाभिमानाने लढा देते. मधुराची हिच जिद्द आज कित्येक तरुणींना लढण्याचं नवे बळ देतेय.
छोटी मालकीण’ मालिकेतील रेवती म्हणजे आदर्श सून आणि आदर्श पत्नी यांचा उत्तम मिलाफ. श्रीमंत कुटुंबात वाढलेली रेवती लग्न होऊन देशमुखांच्या घरात आली. श्रीधरची परिस्थीती गरीब असली तरी मोठ्या मनाची रेवती त्यात सामावून गेली. आता तर संसारासोबतच रेवतीने शिक्षणाचा ध्यासही घेतलाय. इच्छेपुढे आभाळही ठेंगणं असतं. स्त्री शिक्षित असेल तर संपूर्ण कुटुंबाला ती योग्य दिशा देऊ शकते. त्यामुळेच तर लग्नानंतरदेखिल रेवती म्हणजेच ‘छोटी मालकीण’ आपलं शिक्षिका होण्याचं स्वप्न पूर्ण करणार आहे. लग्नानंतर संसारातच अडकून न राहता आपले छंद आपल्या आवडी-निवडी प्रत्येक स्त्रीने जपायला हव्यात  याचा आदर्श रेवतीने घालून दिलाय.
‘नकळत सारे घडले’ मालिकेतील नेहा म्हणजे कर्तृत्ववान स्त्रीचे चालते-बोलते उदाहरण. पेशाने डॉक्टर असणारी नेहा घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना कुठेही कमी पडत नाही. घर-संसारासोबतच आपलं ध्येय गाठणे आणि समाजात स्वत:ची ओळख निर्माण करणं किती महत्त्वाचं आहे याचं पुरेपुर भान तिला आहे. परी आणि अक्षयला तिने जन्म दिला नसला तरी पोटच्या मुलांप्रमाणे ती त्यांचा सांभाळ करते. म्हणूनच तर आई ते यशस्वी डॉक्टर हा मेळ साधणे तिला उत्तमरित्या जमले आहे. संसार आणि स्वकर्तृत्व यांचा मेळ साधणाऱ्या असंख्य स्त्रियांचे नेहा प्रतिनिधित्व करते.
‘ललित २०५’ मालिकेतील भैरवी म्हणजे जुन्या नव्या विचारांमधला दुवा. नव्यासोबतच जुन्या रुढी, परंपरा जपणे तिला महत्त्वाचे वाटते. विखुरलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी भैरवीचे अखंड प्रयत्न सुरु आहेत. यासोबतच घरातल्या थोरामोठ्यांचा सन्मान भैरवीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सासू-सुनेच्या नात्याला तिने मैत्रीचं कोंदण दिलंय. सासु-सुनेचं हेच मैत्रीपूर्ण नाते नव्या बदलांची नांदी म्हणता येईल.


 

Web Title: Star Pravah Channel completed 10 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.