Sangeeta Ghosh needs to prepare for the role of 'Three Hour' | संगीता घोषला 'ह्या' भूमिकेच्या तयारीसाठी लागतात तब्बल तीन तास
संगीता घोषला 'ह्या' भूमिकेच्या तयारीसाठी लागतात तब्बल तीन तास

ठळक मुद्दे‘दिव्य दृष्टी’मध्ये दोन बहिणींची कथा


स्टार प्लस वाहिनी 'दिव्य दृष्टी' ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत छोट्या पडद्यावरील अभिनेत्री संगीता घोष प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेच्या तयारीसाठी तिला तब्बल तीन तास लागतात. 
‘दिव्य दृष्टी’ ही अंगी विशेष शक्ती असलेल्या दोन बहिणींची कथा आहे. दृष्टीला भविष्यात काय घडणार आहे, ते पाहण्याची शक्ती असते; तर या भविष्यात बदल करण्याची शक्ती दिव्या हिच्याकडे असते. अर्थात कोणतीही विशेष शक्ती असली, तरी त्याबरोबर काही तोटेही येतात आणि या दोन्ही बहिणींना पिशाचिनींपासून धोका असतो.


 संगीता घोष या मालिकेत खलनायिका म्हणजेच पिशाचिणीची भूमिका रंगविणार असून ती ही भूमिका साकारण्यासाठी उत्साही आहे. अशा प्रकारची भूमिका ती प्रथमच साकारीत आहे. या पिशाचिणीची व्यक्तिरेखा अगदी वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. तिची वेशभूषा, केशभूषा तसेच तिचा मेक-अप वगैरे सर्वच बाबतीत ती अगदी वेगळी दिसेल. तिला ही रंगभूषा करून आपल्या भूमिकेच्या रूपात येण्यासाठी तब्बल तीन तास लागतात. त्यात तिचे कपडे आणि दागिने यामुळे ही भूमिका उठून दिसते. पण त्यामुळे तिचा मेकअप होण्यास बराच वेळ लागतो. मात्र हा वेळ नक्कीच सार्थकी लागला आहे. संगीता घोषला या आगळ्यावेगळ्या भूमिकेत पाहणे कमालीचे ठरणार आहे. दिव्य दृष्टी ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


Web Title: Sangeeta Ghosh needs to prepare for the role of 'Three Hour'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.