भविष्यातील घटना पाहण्याची आणि त्यात बदल घडविण्याची अद्भुत शक्ती लाभलेल्या दोन बहिणींची कथा असलेली स्टार प्लसवरीलदिव्य दृष्टी’ या मालिकेने प्रेक्षकांना टीव्हीच्या पडद्याला खिळवून ठेवले आहे. आता मालिकेतील प्रेमीयुगुल रक्षित (आध्विक महाजन) आणि दिव्या (नीरा बॅनर्जी) यांनी विवाह केल्यानंतर कथानकाला वेगळे वळण लागले आहे.

मालिकेत दिव्याची जुळी बहीण दृष्टी हिची व्यक्तिरेखा रंगविणारी अभिनेत्री सना सय्यद हिच्या अंगातही दिव्याच्या लग्नाच्या कथाभागामुळे उत्साह संचारला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेले अनेक आठवडे ती या दिवसाची वाट पाहत होती आणि आता लग्नाचा हा दिवस ती खास पद्धतीने साजरा करणार होती.

सना म्हणाली, “मालिकेत या घटना (दिव्याचे लग्न) घडण्याची मी वाटच बघत होते. या लग्नात माझी वेशभूषा मी स्वत:च ठरविली असून ती मी अतिशय आत्मविश्वासाने मिरविली आहे. साधेपणामुळे तुमचं व्यक्तिमत्त्व अधिकच खुलून दिसते, यावर माझा विश्वास असून माझी वेशभूषा आणि रंगभूषेत त्याचेच प्रतिबिंब पडल्याचे दिसते.”


या लग्नात सनाने गर्द हिरव्या रंगाचा ब्लाउज घातला असून त्याला छेद देणारा फिक्या पिवळ्या रंगचा लेहेंगा परिधान केला आहे. लेहेंग्याला सोनेरी जरीची मोठी किनार लावलेली आहे. यावर लाल, हिरवा आणि सोनेरी रंगांचा दुपट्टा ओढून घेतल्याने तो या दोन्ही कपड्यांमधील दुवा असल्याचं जाणवतं.

तिने कमीत कमी दागिने घातले असून माफक, आवश्यक तितकीच रंगभूषा केली आहे. केसांच्या अंबाड्यात तिने फुले माळली आहेत. तिच्या कपाळावरील लाल बिंदीने तिचे रूपसौंदर्य अधिकच खुलविले आहे.


Web Title: Sana Sayyed becomes fashion designer, 'Divya Vision' designed in her own costume
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.