Rishi Saxena is not on the path of Bollywood? | 'काहे दिया परदेस'फेम ऋषी सक्सेनाही बॉलिवूडच्या वाटेवर?

छोट्या पडद्यावरील काहे दिया परदेस या मालिकेतून अभिनेता ऋषी सक्सेना घराघरात पोहचला. त्याने साकारलेला शिव रसिकांना चांगलाच भावला. शिव आणि गौरीची जोडी छोट्या पडद्यावरील हिट जोडी ठरली. काही दिवसांपूर्वी 'काहे दिया परदेस' या मालिकेनं रसिकांचा निरोप घेतला. या मालिकेनंतर आता ऋषी सक्सेना काय करतो आहे हे जाणून घ्यायची रसिकांना नक्कीच उत्सुकता असेल. मालिका संपल्यानंतर त्याचा नवा प्रोजेक्ट काय आहे, तो पुढे मालिकाच करणार की आणखी काय याबाबत जाणून घेण्याची रसिकांमध्ये उत्सुकता आहे. शिव म्हणजेच ऋषी सक्सेना मालिका सुरु असतानाच त्याच्या बॉडीवर विशेष मेहनत घेत होता. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांप्रमाणे तोही अॅब्ज कमावण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. काहे दिया परदेस या मालिकेनं ऋषीला बरीच लोकप्रियता दिली. मराठीच नाही तर हिंदी भाषिक रसिकांचाही तो आवडता बनला. मराठी नसूनही मोठ्या खुबीने त्यानं शिव साकारला. त्यामुळेच मालिका सुरु असताना त्याला हिंदीतून बड्या प्रोजेक्ट्सच्या ऑफर आल्या. त्यासाठीच तो आता बॉडी कमावतो आहे. आता बॉलिवूडच्या दिग्गजांच्या पावलावर पाऊल ठेवून ऋषीसुद्धा अॅब्ज कमावून आपल्या बॉलिवुड पदार्पणासाठी सज्ज होत तर नाही ना अशा शंकांनाही नक्कीच वाव आहे. मध्यंतरी तो हिंदीत मालिका किंवा वेबसिरीज करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती ऋषीकडून समोर आलेली नाही. मराठीत पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येण्याचीही त्याची इच्छा आहे. मात्र 'काहे दिया परदेस'सारखी भूमिका आणि मालिका मिळेल का याबाबत तो साशंक आहे. याशिवाय मराठी सिनेमातही काम करण्याची ऋषी सक्सेनाची इच्छा आहे. शिवप्रमाणेच किंवा काहे दिया परदेस मालिकेप्रमाणेच बाज असलेल्या मराठी सिनेमातही काम करण्याची ऋषीची तयारी आहे. मात्र सध्या तरी त्याचं बॉडी कमावणं,खास करुन अॅब्ज कमावणे यामुळे त्याचे सारं लक्ष बहुदा बॉलिवूडच आहे असंच दिसत आहे.आता आगामी काळात या प्रश्नाचं उत्तर खुद्द ऋषीकडूनच मिळेल,तोवर जस्ट वेट एँड वॉच !

Web Title: Rishi Saxena is not on the path of Bollywood?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.