'तेनाली रामा'मध्‍ये होणार रामाचा दुसरा विवाह?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 07:07 PM2019-03-11T19:07:08+5:302019-03-11T19:10:31+5:30

तेनाली रामा या मालिकेत कृष्‍णदेवरायची (मानव गोहिल) बहीण तिच्‍या भाचीला विवाहासाठी घेऊन येणार आहे. पण ती रामाच्‍या (कृष्‍ण भारद्वाज) प्रेमात पडणार असून तिथून गोंधळाला सुरुवात होणार आहे.

Rama’s second marriage on Sony SAB’s Tenali Rama | 'तेनाली रामा'मध्‍ये होणार रामाचा दुसरा विवाह?

'तेनाली रामा'मध्‍ये होणार रामाचा दुसरा विवाह?

googlenewsNext
ठळक मुद्देरामाच्‍या प्रामाणिकपणाची परीक्षा घेण्‍यासाठी शारदा पैशासाठी रामाला सुगंधाकडे विकते. हे पाहून सर्वजण अचं‍बित होतात. पण यामुळेच कथेला नवे वळण मिळणार आहे.

सोनी सबवरील 'तेनाली रामा' या मालिकेमध्‍ये एका नवीन कलाकाराची एंट्री होणार असून त्यानंतर या मालिकेला एक चांगलेच वळण मिळणार आहे. कृष्‍णदेवरायची (मानव गोहिल) बहीण तिच्‍या भाचीला विवाहासाठी घेऊन येणार आहे. पण ती रामाच्‍या (कृष्‍ण भारद्वाज) प्रेमात पडणार असून तिथून गोंधळाला सुरुवात होणार आहे.

सुगंधा देवीच्‍या (ऐश्‍वर्या राज भकुनी) एंट्रीमुळे रामाच्‍या जीवनात अनेक संकटं निर्माण होणार आहेत. तिचा विवाह खरे तर दुसऱ्या व्यक्तीशी होणार असतो, पण सुगंधा रामाला पाहाताच त्याच्या प्रेमात पडते आणि त्‍याच्‍यासमोर विवाहाचा प्रस्‍ताव ठेवते. या स्थितीचा फायदा घेत तथाचार्य (पंकज बेरी) रामा आणि शारदा यांच्‍यात भांडणे लावण्यासाठी दुष्‍ट खेळी खेळतो. रामाच्‍या प्रामाणिकपणाची परीक्षा घेण्‍यासाठी शारदा पैशासाठी रामाला सुगंधाकडे विकते. हे पाहून सर्वजण अचं‍बित होतात. पण यामुळेच कथेला नवे वळण मिळणार आहे. कारण शारदाच्‍या या कृत्‍यामुळे दुखावलेला रामा स्‍वत:ला आणि मुलगा भास्‍करला विजयनगरमधील दुसऱ्या महिलांना विकण्‍याचे ठरवतो. आता रामा आणि सुगंधा विवाह करण्‍यास सज्‍ज असताना कोणते नाटक घडणार हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

या मालिकेतील एंट्रीबद्दल ऐश्‍वर्या राज भकुनी सांगते, ''मी या मालिकेत काम करण्यासाठी खूपच उत्‍सुक आहे. तेनाली रामाच्‍या सर्व कलाकारांसोबत काम करण्‍याचा अनुभव खूपच छान आहेत. ते अत्‍यंत प्रतिभावान आहेत. सुगंधा या व्यक्तिरेखेमुळे या मालिकेला एक वेगळे वळण मिळणार आहे. प्रेक्षकांना या मालिकेचे आगामी भाग प्रचंड आवडतील अशी मला खात्री आहे. 

रामाची भूमिका साकारणारा कृष्‍ण भारद्वाज मालिकेला मिळणाऱ्या वळणाविषयी सांगतो, ''रामाला त्‍याच्‍या जीवनात आता खूप मोठा धक्‍का बसणार आहे. सुगंधा देवीची त्‍याच्‍यासोबत विवाह करण्‍याची इच्‍छा आहे. तो या परिस्थितीतून कशाप्रकारे बाहेर पडणार हे खूपच मनोरंजक असणार आहे. प्रेक्षकांनी नेहमीच आमच्या मालिकेवर भरपूर प्रेम केले आहे. मी आशा करतो की, त्‍यांचे हे प्रेम कायम राहील.''
 
प्रेक्षकांना 'तेनाली रामा' ही मालिका दर सोमवार आणि शुक्रवार सायंकाळी ७.३० वाजता सबवर पाहायला मिळते. 

Web Title: Rama’s second marriage on Sony SAB’s Tenali Rama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.