सोनी सबच्‍या 'तेनाली रामा'मध्‍ये रामाला जावे लागेल का राज्य सोडून?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 10:47 AM2018-09-08T10:47:16+5:302018-09-08T21:00:00+5:30

तेनाली रामा या मालिकेमध्‍ये रामा नेहमीच कोणत्या ना कोणत्या संकटात सापडलेला असतो. पण त्‍यातूनही तो मार्ग काढतो असे आपल्याला पाहायला मिळते. तेनालीचा हा गुण प्रेक्षकांना चांगलाच आवडत आहे.

Rama will leave vijayanagar in Sony Sab Tenali Rama? | सोनी सबच्‍या 'तेनाली रामा'मध्‍ये रामाला जावे लागेल का राज्य सोडून?

सोनी सबच्‍या 'तेनाली रामा'मध्‍ये रामाला जावे लागेल का राज्य सोडून?

googlenewsNext

सोनी सबवरील 'तेनाली रामा' ही मालिका प्रेक्षकांची अतिशय आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड भावत आहेत. रामा तर प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाला आहे. या मालिकेत कृष्‍णा भारद्वाज, मानव गोहिल यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत असून प्रेक्षकांना त्यांचा अभिनय खूप आवडत आहे.

तेनाली रामा या मालिकेमध्‍ये रामा नेहमीच कोणत्या ना कोणत्या संकटात सापडलेला असतो. पण त्‍यातूनही तो मार्ग काढतो असे आपल्याला पाहायला मिळते. तेनालीचा हा गुण प्रेक्षकांना चांगलाच आवडत आहे. तसेच तो आपली विनोदी वृत्‍ती आणि कृष्‍णदेवराय प्रती असलेल्‍या प्रामाणिकपणामुळे दर्शकांचे लक्ष वेधून घेत आहे. नुकत्याच झालेल्या एपिसोड्समध्‍ये आपण पाहिले की, रामा (कृष्‍णा भारद्वाज) आणि त्‍याचा मुलगा भास्‍कर यांनी विजयनगरमधून मुले पळवून नेणाऱ्या भजनी देवीला सापळा रचून पकडून दिले.  
याचे बक्षीस म्‍हणून, राजा कृष्‍णदेवरायने (मानव गोहिल) त्‍याला सोन्‍याची नाणी भेट म्‍हणून दिली. पण रामा हा मनाने चांगला असल्‍याने तो ती नाणी गरजूंना दान करणार आहे. मात्र दुष्‍ट तथाचार्य (पंकज बेरी) राजा कृष्‍णदेवरायला याबाबत सांगणार असून राजाच्‍या मनात रामाच्या विरोधात भरवून देणार आहे. तथाचार्य राजाला असे भासवणार आहे की, असे करून रामाने राजाचा अनादर केला आहे. त्‍यामुळे राजा रामाला त्‍याचे राज्‍य सोडून जायला सांगणार आहे. यादरम्‍यान, तथा‍चार्यची बहीण अनंतलक्ष्‍मी (चाहत मनी पांडे) आणि शारदाचा भाऊ गोविंदुलू (मेघान जाधव) यांची एंट्री होणार आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांना खळखळून हसायला मिळणार आहे. 

राजा कृष्‍णदेवराय रामाला क्षमा करेल की, त्‍याला राज्‍यातून हद्दपार करेल? हे आपल्याला या मालिकेच्या आगामी भागांमध्येच पाहायला मिळेल. तेनाली रामा या मालिकेत राजा कृष्‍णदेवरायची व्‍यक्तिरेखा साकारणारा मानव गोहिल याविषयी सांगतो, ''आगामी एपिसोड्समध्‍ये रामाच्या विरोधात काही कट-कारस्‍थाने रचली जाणार आहेत. यामुळे दर्शकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे. कृष्‍णदेवरायचे रामासोबत एक सुंदर नाते आहे आणि दर्शकांना त्‍यांच्‍या मित्रत्‍वाची परीक्षा पाहायला मिळणार आहे.'' 
 

Web Title: Rama will leave vijayanagar in Sony Sab Tenali Rama?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.