ए. आर. रेहमान आणि हर्षदीप कौर एकत्र दिसणार ह्या मंचावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 07:15 AM2019-01-22T07:15:00+5:302019-01-22T07:15:00+5:30

स्टार प्लस वाहिनीवरील 'दि व्हॉईस' हा सर्वांत मोठा संगीत सोहळा बनणार असून ह्या शोमध्ये देशातील मोठमोठे संगीत कलाकार एक अल्टिमेट आवाज शोधण्यासाठी एकत्र येत आहेत.

A R Rahman and Harshdeep Kaur reunite for The Voice | ए. आर. रेहमान आणि हर्षदीप कौर एकत्र दिसणार ह्या मंचावर

ए. आर. रेहमान आणि हर्षदीप कौर एकत्र दिसणार ह्या मंचावर

googlenewsNext
ठळक मुद्देए. आर. रेहमान दिसणार सुपर जजच्या भूमिकेतहर्षदीप दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत

स्टार प्लस वाहिनीवरील 'दि व्हॉईस' हा सर्वांत मोठा संगीत सोहळा बनणार असून ह्या शोमध्ये देशातील मोठमोठे संगीत कलाकार एक अल्टिमेट आवाज शोधण्यासाठी एकत्र येत आहेत. म्युझिक माएस्ट्रो ए. आर. रेहमान ह्या शोमध्ये सुपर जजच्या रूपात दिसणार असून त्यांच्यासोबत विख्यात गायिका हर्षदीप कौरही ह्या शोमध्ये दिसणार आहे. हे दोन्ही नावाजलेले संगीत कलाकार ह्या शोसाठी दीर्घ काळानंतर एकत्र पाहायला मिळणार आहेत.

सूत्रांनुसार, ए. आर. रेहमान आणि हर्षदीप कौर हे एकत्र येतात तेव्हा ते जादू निर्माण करतात. हर्षदीपने ए.आर, रेहमान यांच्यासाठी गाणीच गायली नाही आहेत तर त्यांच्यासोबत कॉन्सर्ट्‌सही केली आहेत. एका ब्रेकनंतर ए. आर. रेहमान हे सुपर जज आणि हर्षदीप परीक्षकाच्या रूपात दिसणार आहेत. ह्यावेळेस ते अगदी नवीन रूपात दिसतील, जिथे ते ह्या शोमधील स्पर्धकांना मार्गदर्शन करतील. स्टार प्लसवरील 'दि व्हॉईस'मध्ये ए. आर. रेहमान आणि हर्षदीप कौर यांना एकत्र पाहताना खरंच खूप छान वाटेल.


जगभरात अत्यंत लोकप्रिय असलेला उत्कृष्ट गायकांचा शो आणि चार एमी पुरस्कारांनी गौरविला गेलेला कार्यक्रम ‘द व्हॉइस’ने जगातील 180 देशांमध्ये विलक्षण लोकप्रियता संपादन केले आहे. आता भारतातही केवळ ‘स्टार प्लस’ वाहिनीवर या कार्यक्रमाचे लवकरच प्रसारण केले जाणार आहे. भारतातील उत्कृष्ट गायकांचा शोध घेण्यासाठी द व्हॉइस या कार्यक्रमात केवळ उत्कृष्ट आवाजाच्या दर्जावरच भिस्त ठेवली जाणार असून त्यात जात-पात, लिंग, धर्म, भाषा, प्रादेशिकता वगैरे कोणतेही भेद केले जाणार नाहीत.

Web Title: A R Rahman and Harshdeep Kaur reunite for The Voice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.