दावांशची भूमिका साकारणे मला आवडले - हर्ष राजपूत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 09:44 AM2018-08-07T09:44:38+5:302018-08-07T09:56:40+5:30

अभिनेता हर्ष राजपूत स्टारप्लसवरील नवीन मालिका नजरमध्ये अंश राठोडची भूमिका करत आहे. आपल्या व्यक्तिरेखेच्या वेगळेपणामुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Playing a Daavansh excited me- Harsh Rajput | दावांशची भूमिका साकारणे मला आवडले - हर्ष राजपूत

दावांशची भूमिका साकारणे मला आवडले - हर्ष राजपूत

googlenewsNext

अभिनेता हर्ष राजपूत स्टारप्लसवरील नवीन मालिका 'नजर'मध्ये अंश राठोडची भूमिका करत आहे. आपल्या व्यक्तिरेखेच्या वेगळेपणामुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ते यात सुपरनॅचरल दावांशची भूमिका करत असून तो अर्धा मनुष्य आणि अर्धा डायन आहे.

हर्ष म्हणाला “ह्या शो ची संकल्पना अतिशय खास असून तेच मला सर्वाधिक आवडले आहे. मी ह्या शोमध्ये दावांश साकरत असून एक अभिनेता म्हणून असे ह्याआधी मी कधीही केले नाहीये. त्यामुळे ते मला आवडले आणि ह्या कथानकाला मी होकार दिला. सुपरनॅचरल व्यक्तिरेखा साकारणे नक्कीच आव्हानात्मक आहे. ह्या व्यक्तिरेखेला अनेक स्तर आहेत. माझी व्यक्तिरेखा अंश खरं तर गोड साधा मुलगा असून त्याचे त्याच्या परिवारावर प्रेम आहे. दावांश त्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये गडद बाजू आणतो. ह्या शो ने मला सुपरनॅचरल प्रकाराचा भाग बनण्याची संधी दिली आणि अशा प्रकारची भूमिका साकारताना मी अतिशय उत्साहात आहे.”

आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक भूमिका निभावलेला हर्ष आता एका वेगळ्‌या रूपात प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसून येणार आहे. या मालिकेत राठोड कुटुंबियांच्या अनेक पिढ्यांना मोहना नावाच्या एका डायनची (हडळीची) नजर लागली असून त्याचा त्यांच्या जीवनावर कसा विपरित परिणाम होत असतो, ते यात दाखवण्यात आले आहे. यात अनेक दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत असून ते या डायनची शक्ती किती ताकदवान आहे, ते उघड करतील. याविषयी मोनालिसा सांगते की, “या मालिकेत एका डायनची भूमिकेत मी रसिकासमोर येणार आहे.त्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी खूप खास आहे.मालिकेतील प्रसंग हे कोणत्या तरी दुर्गम ठिकाणी घडत नसून ते माणसानी गजबजलेल्या शहरी वस्त्यांमध्ये आणि आजच्या काळात घडतात.यातील मोहनाचे सैंदर्य आणि तिच्या रूपाभोवती असलेल्या वलयामुळे ही भूमिका स्विकारली.मुळात तिच्या आरस्पानी सौंदर्यामुळे पुरुष घायाळ होतात आणि दुसर-यांना संमोहित करण्याच्या शक्तीमुळे ती इतरांकडून तिला हवी ती कामं करवून घेते. 

Web Title: Playing a Daavansh excited me- Harsh Rajput

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nazarनजर