पटियाला बेब्स या मालिकेने दिला हा सामाजिक संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 07:15 AM2019-03-07T07:15:00+5:302019-03-07T07:15:01+5:30

पटियाला बेब्स या मालिकेत बबिता तिच्या आयुष्यातील एका नवीन वळणावर येऊन पोचली आहे. तिचा तिच्या नवऱ्याशी घटस्फोट झाला आहे आणि ती आपल्या कुटुंबाच्या आर्थिक साहाय्यासाठी नोकरी शोधत आहे.

Patiala Babes has made me aware about a lot of Women Rights”: Paridhi Sharma | पटियाला बेब्स या मालिकेने दिला हा सामाजिक संदेश

पटियाला बेब्स या मालिकेने दिला हा सामाजिक संदेश

googlenewsNext
ठळक मुद्देया कार्यक्रमातील एका प्रसंगात बबिता एका रेस्टॉरंटमधील वॉशरूममध्ये जाण्यासाठी विचारते तेव्हा तिथला मॅनेजर तिला थांबवतो आणि सांगतो की, तुम्ही इथे काहीही घेतलेलं नाही. त्यामुळे इथल्या वॉशरूमचा तुम्ही वापर करू शकत नाही.तेव्हा मिता यात मध्यस्थी करते आणि मॅनेजरला सांगते की, सार्वजनिक ठिकाणी असलेले वॉशरूम वापरण्यासाठी कायद्याने कोणीही कोणाला अडवू शकत नाही.

सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनवरील पटियाला बेब्स या कार्यक्रमात एक आई आणि तिच्या मुलीमधील नात्याचे सुंदर चित्रण करण्यात आले आहे आणि आता बबिता तिच्या आयुष्यातील एका नवीन वळणावर येऊन पोचली आहे. तिचा तिच्या नवऱ्याशी घटस्फोट झाला आहे आणि ती आपल्या कुटुंबाच्या आर्थिक साहाय्यासाठी नोकरी शोधत आहे. या कार्यक्रमातील एका प्रसंगात बबिता एका रेस्टॉरंटमधील वॉशरूममध्ये जाण्यासाठी विचारते तेव्हा तिथला मॅनेजर तिला थांबवतो आणि सांगतो की, तुम्ही इथे काहीही घेतलेलं नाही. त्यामुळे इथल्या वॉशरूमचा तुम्ही वापर करू शकत नाही. तेव्हा मिता यात मध्यस्थी करते आणि मॅनेजरला सांगते की, सार्वजनिक ठिकाणी असलेले वॉशरूम वापरण्यासाठी कायद्याने कोणीही कोणाला अडवू शकत नाही.

या प्रसंगाचं चित्रीकरण करताना बबिताची भूमिका साकारणाऱ्या परिधी शर्माला हा नियम नव्याने समजला. याविषयी ती सांगते, "एक अभिनेत्री असल्याने मला लोकांनी कधीच वॉशरूमचा वापर करण्यासाठी थांबवलं नाही. पण मी कल्पना करू शकते की, अनेक महिला अशा प्रसंगांना सामोऱ्या जात असतील. जरी 'पे अँड युज' प्रकारची सार्वजनिक शौचालयं उपलब्ध असली तरी त्यांची संख्या आवश्यकतेपेक्षा खूपच कमी आहेत आणि जी आहेत ती अस्वच्छ असतात. आरोग्याच्या मूलभूत सेवांसाठी कोणाला रोखणं खूप असंवेदनशीलतेचं लक्षण आहे. पटियाला बेब्स या मालिकेमुळे माझ्या ज्ञानात भर पडण्यास मदत होत आहे याचा मला आनंद होत आहे. याचं दुसरं उदाहरण म्हणजे एक स्त्री तिचा खटला स्वतः लढवू शकते हे देखील मला या मालिकेमुळे कळले. आपल्या देशातील महिलांना आरोग्याच्या सुरक्षित आणि स्वच्छ सोयीसुविधा मिळू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर लोकसंख्या आणि त्या पटीत असणारी शौचालयं ह्यांचं प्रमाण खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही ठिकाणी वॉशरूम वापरण्यासाठी लोकांना पैसे खर्च करायला लागू नयेत याची जाणीव करून देणं महत्वाचं आहे आणि हेच आम्ही मालिकेद्वारे केले आहे."

पटियाला बेब्स ही मालिका प्रेक्षकांना सोमवार ते शुक्रवार रात्री ९:०० सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळते. 

Web Title: Patiala Babes has made me aware about a lot of Women Rights”: Paridhi Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.