इंडियन आयडल 10 या कार्यक्रमात या कारणामुळे नेहा कक्कडला आवरले नाहीत तिचे अश्रू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 04:45 PM2018-09-19T16:45:04+5:302018-09-20T06:30:00+5:30

अंकुश भारद्वाजने ‘मेरी माँ’ हे क्लासिक गाणे इतके हळुवारपणे म्हटले की, ते ऐकून नेहा कक्कड, विशाल दादलानी आणि अन्नू मलिक सहित सर्व जण भावनाविवश झाले.

Neha Kakkar can't stop crying after watching Ankush performance in Indian Idol 10 | इंडियन आयडल 10 या कार्यक्रमात या कारणामुळे नेहा कक्कडला आवरले नाहीत तिचे अश्रू

इंडियन आयडल 10 या कार्यक्रमात या कारणामुळे नेहा कक्कडला आवरले नाहीत तिचे अश्रू

googlenewsNext

आज आपण जे कोणी आहोत किंवा जे बनण्याची आकांक्षा करत आहोत, ते केवळ आपल्या माता-पित्यांमुळे आणि विशेषतः आईमुळेच आहोत. त्यामुळेच येत्या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल 10 च्या ‘माँ स्पेशल’ या विशेष भागात मातृत्वाच्या भावनेस नमन करण्यात आले आहे. या भागात सगळ्याच स्पर्धकांनी एकाहून एक सरस परफॉर्मन्स सादर केले.

इंडियन आयडलच्या या खास भागासाठी सुप्रसिद्ध गीतकार मनोज मुन्तशिर यांनी नुकतेच चित्रीकरण केले.  सर्वोत्कृष्ट 11 स्पर्धकांचे परफॉर्मन्स पाहून थक्क झाले होते. अंकुश भारद्वाजने ‘मेरी माँ’ हे क्लासिक गाणे इतके हळुवारपणे म्हटले की, ते ऐकून नेहा कक्कड, विशाल दादलानी आणि अन्नू मलिक सहित सर्व जण भावनाविवश झाले. नेहा कक्कडला तर आपले अश्रु आवरले नाहीत.
 
अंकुशचा हा परफॉर्मन्स झाल्यानंतर त्याला खूप छान सरप्राईज मिळाले. अंकुशच्या आई-वडिलांनी इंडियन आयडॉल 10 च्या मंचावर येऊन त्याला एक सुखद आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर त्याने आपल्या लहानपणच्या काही आठवणी सांगितल्या. इतके भावनिक गाणे म्हटल्यानंतर अंकुशने आपल्या आईला मंगळसूत्र भेट म्हणून दिले, जे तिला अंकुशच्या आजारपणाच्या खर्चासाठी गहाण ठेवावे लागले होते. अंकुशने आपल्या लहानपणीच्या त्या दिवसांची आठवण सांगितली, जेव्हा त्याचे आई-वडील रस्ता क्रॉस करताना त्याला आपल्या खांद्यावर घेऊन जात. त्यांनी त्याच्यासाठी आजवर किती परिश्रम घेतले आहे हे त्याने सांगितले.
 
इतक्या हेलावून टाकणार्‍या परफॉर्मन्सनंतर नेहा कक्कड म्हणाली, “हे अतिशय सुरेख गीत आहे आणि अंकुशने ते ज्या रीतीने म्हटले, ते लक्षणीय होते. अंकुश परफॉर्म करत असताना मला माझे अश्रू आवरत नव्हते. आपली आई ही आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती असते आणि अंकुशने ही भावना आपल्या गीतातून समर्थपणे अभिव्यक्त केली. अंकुशचे आरोग्य आणि जलद रिकव्हरीसाठी मी देवीकडे प्रार्थना करेन.”
 
इंडियन आयडल 10 चा माँ स्पेशल भाग प्रेक्षकांना या शनिवारी रात्री 8 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे.

 

Web Title: Neha Kakkar can't stop crying after watching Ankush performance in Indian Idol 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.