MUST SEE: मानसी म्हणजेच मयुरी देशमुखचा वेल्डींग अल्बम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2017 12:18 IST2017-05-09T06:48:13+5:302017-05-09T12:18:13+5:30
खुलता कळी खुलेना या मालिकेतून रसिकांचे मनोरंजन करणारी मानसी म्हणजेत मयुरी देशमुख तिच्या ख-या आयुष्यात विवाहीत असल्याचे सा-यांनाच माहिती ...
.jpg)
MUST SEE: मानसी म्हणजेच मयुरी देशमुखचा वेल्डींग अल्बम
ख लता कळी खुलेना या मालिकेतून रसिकांचे मनोरंजन करणारी मानसी म्हणजेत मयुरी देशमुख तिच्या ख-या आयुष्यात विवाहीत असल्याचे सा-यांनाच माहिती आहे. मालिकेत तिच्या अभिनयासह तिच्या सौदर्यांनेही रसिकांचे मनं जिंकली आहेत. आपल्या आवडत्या कलाकारांच्या ख-या आयुष्यातील सगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपण सगळेच उत्सुक असतो. म्हणून आज आपण सगळ्यांची लाडकी मानसी म्हणजेच मयुरीचा वेडींग अल्बमवर नजर टाकणार आहोत. सोशल मीडियावर मयुरीच्या लग्नाच्या खास फोटोंना खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत.आशुतोष भाकरेसह मयुरीने लग्न केले असून आशुतोषही एक कलाकार आहे. यापूर्वी आशुतोषने इचार ठरला पक्का, बायको असावी अशी आणि भाकर या सिनेमांमध्ये आशुतोषने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे आशुतोषची मध्यवर्ती भूमिका असलेल्या भाकर या सिनेमाचे कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमिअर झाला होता. विशेष म्हणजे वयाच्या २५ व्या वर्षी मानसी लग्नाच्या बेडीत अडकली होती.मयुरीच्या वेडींग अल्बम नेटीझन्सच्या पसंतीस उतरत असून तिच्या चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारत असल्याचे पाहायला मिळत आहेत. तिच्या साडी पासून ते तिच्या मेकअपपर्यंत सगळ्या गोष्टीची माहिती मिळवत असल्याचे पाहायला मिळत आहेत. रिल लाईफमध्ये जितकी मयुरी सुंदर दिसते तितकीच रिअल लाईफमध्येही मयुरीवर सगळेच फिदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या वेडींग सिझन सुरू असल्यामुळे अनेक मुलींना त्यांच्या लग्नात अगदी मयुरीप्रमाणेच दिसावे अशी इच्छा बाळगताना दिसतायेत. सध्या मालिकेमुळे घराघरांत पोहचलेली मानसी म्हणजेच मयुरीच्या चाहत्या वर्गातही दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
![]()
![]()
![]()