चला हवा येऊ द्या पाचव्या क्रमांकावर, जाणून घ्या पहिल्या नंबरवर कोणी मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 08:01 PM2018-12-20T20:01:36+5:302018-12-20T20:06:30+5:30

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार चला हवा येऊ द्या ही मालिका यंदाच्या आठवड्यात पाचव्या क्रमांकावर आहे

Mazhya navryachi Bayko is on top in TRP race | चला हवा येऊ द्या पाचव्या क्रमांकावर, जाणून घ्या पहिल्या नंबरवर कोणी मारली बाजी

चला हवा येऊ द्या पाचव्या क्रमांकावर, जाणून घ्या पहिल्या नंबरवर कोणी मारली बाजी

googlenewsNext
ठळक मुद्देया आठवड्याच्या बार्क रिपोर्टनुसार माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका पहिल्या स्थानावर आहे.ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार दुसऱ्या क्रमांकावर सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची तुला पाहते रे ही मालिका आहे.राणा दा आणि अंजली यांची तुझ्यात जीव रंगला ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे तर चौथ्या क्रमांकावर स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका आहे.

छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतात. या मालिकांमधून घराघरात घडणाऱ्या घडमोडी दाखवल्या जातात. त्यामुळे या मालिकांसोबत रसिकांचं वेगळं नातं निर्माण होतं. मालिकेत घडणाऱ्या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरू आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे या मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात.

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार चला हवा येऊ द्या ही मालिका यंदाच्या आठवड्यात पाचव्या क्रमांकावर आहे तर या आठवड्याच्या बार्क रिपोर्टनुसार माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. अभिजीत खांडकेकर, इशा केसकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. गेल्या कित्येक आठवड्यापासून या रिपोर्टमध्ये माझ्या नवऱ्याची बायको हीच मालिका अव्वल स्थानावर आहे. केवळ गेल्या आठवड्यात तुला पाहाते रे ही मालिका सर्वाधिक पाहिली गेली होती. 

ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार दुसऱ्या क्रमांकावर सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची तुला पाहते रे ही मालिका आहे. या मालिकेतील सुबोध आणि गायत्रीच्या केमिस्ट्रीची सध्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा आहे. ही जोडी आणि त्यांच्यातील प्रेमकथा प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. त्या दोघांचे लग्न कधी होणार याची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. राणा दा आणि अंजली यांची तुझ्यात जीव रंगला ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे तर चौथ्या क्रमांकावर स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका आहे.

विशेष म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टमध्ये अव्वल स्थानावर असणाऱ्या सगळ्याच मालिका या झी मराठी या वाहिनीवरील आहेत. गेल्या अनेक आठवड्यांपासून ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या पहिल्या पाच भागात झी वाहिनीवरीलच या मालिकांनी आपले वर्चस्व निर्माण केले आहे. 

तुला पाहाते रे आणि माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून अटीतटीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. 
 

Web Title: Mazhya navryachi Bayko is on top in TRP race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.