लवकरच साजरा करणार शेवटचा वाढदिवस, लाइव्ह चॅटमधील प्रसिद्ध अभिनेत्याच्या विधानाने त्याच्या फॅन्सच्या काळजाचा चुकला ठोका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 09:35 PM2018-10-15T21:35:50+5:302018-10-15T21:38:18+5:30

गौतमचे हे वाक्य ऐकून त्याच्या साऱ्यांना फॅन्सना धक्का बसला आहे. हा आपला शेवटचं बर्थ डे असेल असं तो का म्हणाला? गौतमने लाइव्ह चॅट अचानक का बंद केली ? असे एक ना अनेक प्रश्न गौतमच्या फॅन्सना पडले आहेत.

The last birthday to be celebrated, the famous actress of Live Chat says her frenzy lapse | लवकरच साजरा करणार शेवटचा वाढदिवस, लाइव्ह चॅटमधील प्रसिद्ध अभिनेत्याच्या विधानाने त्याच्या फॅन्सच्या काळजाचा चुकला ठोका

लवकरच साजरा करणार शेवटचा वाढदिवस, लाइव्ह चॅटमधील प्रसिद्ध अभिनेत्याच्या विधानाने त्याच्या फॅन्सच्या काळजाचा चुकला ठोका

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता गौतम रोडे याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल ठरतो आहे. सूर्यपुत्र कर्ण आणि सरस्वतीचंद्र या मालिकांमध्ये गौतमने प्रमुख भूमिका साकारली होती. आपल्या अभिनयाने त्याने रसिकांची मनं जिंकली होती. मात्र सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओने त्याच्या फॅन्सच्या काळजाचा ठोका चुकला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून गौतम त्याच्या फॅन्सशी लाइव्ह संवाद साधत होता. गप्पा ऐन रंगात असताना त्याच्या एका फॅनने त्याला यंदाचा वाढदिवस कसा साजरा केला? असा प्रश्न विचारला. 15 ऑगस्टला गौतमचा वाढदिवस असतो. फॅनच्या या प्रश्नाला उत्तर देताना यंदा वाढदिवस साजरा केलाच नसल्याचे आधी त्याने स्पष्ट केले. मात्र लवकरच हा वाढदिवस सेलिब्रेट करणार असल्याचे त्याने सांगितले. मात्र वाढदिवसाचे हे सेलिब्रेशन आपल्यासाठी अखेरचे असेल एवढं बोलत त्याने लाइव्ह चॅट बंद केली. गौतमचे हे वाक्य ऐकून त्याच्या साऱ्यांना फॅन्सना धक्का बसला आहे. हा आपला शेवटचं बर्थ डे असेल असं तो का म्हणाला? गौतमने लाइव्ह चॅट अचानक का बंद केली ? असे एक ना अनेक प्रश्न गौतमच्या फॅन्सना पडले आहेत.

हे आहे गौतमच्या अखेरच्या बर्थडे सेलिब्रेशनमागचे कारण... 

मात्र आता जरा पुढे वाचा, गौतमचा हा व्हीडीओ पब्लिसिटी स्टंट तर नाही ना असा प्रश्नही उपस्थित होतोय...तसेच चाहतेही असे अनेक प्रश्न त्याला विचारताना पाहयला मिळत आहेत. गौतमचा पब्लिसिटी स्टंटच असल्याचे माहिती समोर आली आहे.गौतम 16 अॅाक्टोबरला  त्याच्या नवी मालिका काल भैरव मालिकेची घोषणा करणार आहे. याच मालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवर गौतमच्या शेवटच्या बर्थ डे सेलिब्रेशनविषयी जाणून घ्यायचे असेल तर आवर्जुन उपस्थित राहा असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे गौतमचा हा निव्वळ एक पब्लिसिटी स्टंट असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कधी कधी कलाकारही पब्लिसिटी मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Web Title: The last birthday to be celebrated, the famous actress of Live Chat says her frenzy lapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.