दुबईच्या जेलमधून झाली या अभिनेत्याच्या पत्नीची सुटका, या कारणामुळे पोहोचली होती जेलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 12:35 PM2019-04-17T12:35:51+5:302019-04-17T12:36:30+5:30

दुबईमधील सरकारी अधिकाऱ्यांना धमकी दिल्याच्या आरोपावरून रुबीला गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती.

Amit Tandon's wife back from Dubai jail | दुबईच्या जेलमधून झाली या अभिनेत्याच्या पत्नीची सुटका, या कारणामुळे पोहोचली होती जेलमध्ये

दुबईच्या जेलमधून झाली या अभिनेत्याच्या पत्नीची सुटका, या कारणामुळे पोहोचली होती जेलमध्ये

googlenewsNext
ठळक मुद्देअमित सांगतो, आमच्या आयुष्यातील हा अतिशय वाईट काळ होता. आमची मुलगी केवळ सात वर्षांची असल्याने हे सगळे काय सुरू आहे हे तिला समजावणे माझ्यासाठी खूपच कठीण होते. रुबीची आठवण काढून ती रात्रभर रडत बसायची.

अमित टंडनने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेद्वारे केली. खरे तर इंडियन आयडल या कार्यक्रमात तो झळकला होता. त्याच्या आवाजाचे सगळ्यांनी कौतुक देखील केले होते. पण त्याला क्योंकीमध्ये काम करायची संधी मिळाली आणि तो अभिनयक्षेत्राकडे वळला. अमितने दिल मिल गये, जिनी और जुजू यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. 

अमितने रूबी सोबत दहा वर्षांपूर्वी लग्न केले होते. रुबी ही डॉक्टर असून त्यांना सात वर्षांची मुलगी देखील आहे. त्या दोघांची ओळख सोशल नेटवर्किंगद्वारे झाली होती. त्यावेळी अमित मुंबईत तर रुबी शिकागोमध्ये राहात होते. पहिल्याच भेटीनंतर काहीच दिवसांत त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. 

अमित आणि रुबीच्या नात्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून दुरावा आला असून ती दुबईत राहात होती. पण दुबईमधील सरकारी अधिकाऱ्यांना धमकी दिल्याच्या आरोपावरून तिला गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. दुबईतील अल राफा जेलमध्ये तिला ठेवण्यात आले होते. आता दहा महिन्यांनंतर तिची जेलमधून सुटका झाली असून ती मुंबईत परत आली आहे. रुबी ही प्रसिद्ध डर्मेटोलॉजिस्ट असून छोट्या पडद्यावरचे अनेक प्रसिद्ध कलाकार तिचे क्लाइंट आहेत.  

रुबी या सगळ्या प्रकरणात अडकण्याआधी अमित आणि रुबीने वेगळे व्हायचा निर्णय घेतला होता. पण रुबी आता अमित आणि तिच्या मुलीसोबत राहात आहे. याविषयी अमित सांगतो, आमच्या आयुष्यातील हा अतिशय वाईट काळ होता. आमची मुलगी केवळ सात वर्षांची असल्याने हे सगळे काय सुरू आहे हे तिला समजावणे माझ्यासाठी खूपच कठीण होते. रुबीची आठवण काढून ती रात्रभर रडत बसायची. या सगळ्यात आम्हाला प्रचंड आर्थिक नुकसान झाले. पण यामुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. दुबईची न्यायव्यवस्था खूपच किचकट आहे. आम्हाला कोर्टाची तारीख मिळायला जवळजवळ १० महिने गेले. रुबी आता भारतात परतली असून हळूहळू तिच्या कामाला तिने पुन्हा सुरुवात केली आहे. ती अतिशय स्ट्राँग असून तिच्या जागी मी असतो तर मला वेडच लागले असते. आम्ही आमच्या नात्याला पुन्हा एक संधी देत आहोत. आम्ही आता एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स झालो असून एकत्र राहात आहोत.

Web Title: Amit Tandon's wife back from Dubai jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.